शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : फ्लशलाही इगो आहे म्हणत शशांक केतकरने शेअर केला टॉयलेटमधील व्हिडीओ, नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट, म्हणाले, “तुझी कॉमेडी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 12, 2024 | 6:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shashank ketkar viral video

Video : फ्लशलाही इगो आहे म्हणत शशांक केतकरने शेअर केला टॉयलेटमधील व्हिडीओ, नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट, म्हणाले, "तुझी कॉमेडी..."

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून ‘श्री’ची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर हा नेहमी चर्चेत असतो. या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे त्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. या भूमिकेमुळे तो महाराष्ट्रातील घरा घरात पोहोचला. त्याने आतापर्यंत मालिकांबरोबर मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आला होता. आता पुन्हा एकदा तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून दिसून येत आहे. याबरोबरच तो सोशल मीडियावर देखील अधिक सक्रिय असून चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. (shashank ketkar viral video)

शशांक आपल्या सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.  तसेच या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने एका बाथरुममधील टॉयलेटच्या फ्लशबद्दल मजेशीर वाक्य बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – महेश मांजरेकर झाले गायक, स्वतःच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामध्ये गायलेलं गाणं प्रदर्शित, व्हिडीओ पाहून चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

सदर व्हिडीओमध्ये तो एका आरशासमोर उभा आहे. तिथे व्हिडीओमध्ये आजकाल कोणालापण इगो असतो यार असे म्हणत तो फ्लशच्या टॅंककडे बोट दाखवतो. ज्यावर इगो असे लिहिलेले असते आणि फ्लश करतो. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याखाली “फ्लशला इगो असून चालणार नाही!!! वांदे होतील इगो जागच्या जागी उतरवला पाहिजे, फार वाढत चालला आहे. #निव्वळ मज्जा #fun #shooting #outdoor”, असे कॅप्शन लिहिले आहे.

आणखी वाचा – Video : खान मंडळींच्या घराबाहेर ईदला चाहत्यांची तुफान गर्दी, सलमानला बघायला आलेल्या लोकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा काय काय घडलं?

दरम्यान त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एक नेटकरी म्हणतो की , “वाह सर, तुमच्या क्रिएटीव्हिटिला तोड नाही”, दुसरा नेटकरी लिहितो, “काहीही ह श्री”, तिसरा नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणत आहे की, “सर तुमच्या कॉमेडीला भावपूर्ण श्रद्धांजली”,  तसेच अजून एकाने म्हंटले आहे की, “तुमच्या या कॉमेडीला देखील असंच नेऊन फ्लश केलं पाहिजे” असं म्हणत त्याला ट्रोलदेखील करत आहेत.

Tags: honar sun mi ya gharchishashank ketkarshriviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial new video out on social media

अक्षरा व चंचला एकाच स्पर्धेमध्ये होणार सहभागी, भुवनेश्वरी सूनबाईंना हरवण्यासाठी खेळणार नवी खेळी, अधिपतीचा पाठिंबा कोणाला?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.