मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : खान मंडळींच्या घराबाहेर ईदला चाहत्यांची तुफान गर्दी, सलमानला बघायला आलेल्या लोकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा काय काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 12, 2024 | 4:22 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
bollywood actors eid celebration

Video : खान मंडळींच्या घराबाहेर ईदला चाहत्यांची तुफान गर्दी, सलमानला बघायला आलेल्या लोकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा काय काय घडलं?

गुरुवारी संपूर्ण देशभरात ईद साजरी केली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार ईद साजरी करताना दिसून आले. बॉलिवूडमधील कलाकारांनी हटके अंदाजात ईद साजरी करताना दिसून आले. काही कलाकारांनी सोशल मीडियावरुनही शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व सलमान खानने  नेहमीप्रमाणे घराच्या बाल्कनीमध्ये येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी आमिर खानने चाहत्यांना वेगळे सरप्राइज दिले आहे. (bollywood actors eid celebration)

दरवर्षीप्रमाणे शाहरुख खानचे अनेक चाहते मन्नत बंगल्याबाहेर त्याची वाट पाहत होते. शाहरुख दरवर्षी ईदच्या दिवशी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये येऊन चाहत्यांना अभिवादन करुन शुभेच्छा देतो. यावेळी शाहरुख त्याचा लहान मुलगा अबरामही होता. दोघांनीही यावेळी पंधरा कुर्ता व पायजमा घातला होता.

आणखी वाचा – राजाध्यक्षांच्या घरात मृत्यूचं तांडव होणार, विरोचक व देवी आईच्या युद्धामध्ये कोणाचा पहिला बळी जाणार?, नेत्राचा रुद्रावतार अन्…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्याचप्रमाणे आमिर देखील आझाद व जुनैद या दोन्ही मुलांसह ईदच्या दिवशी दिसून आला. मुलांसाहित घराच्या बाहेर येऊन मीडियाला व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने चाहत्यांमध्ये गेला असता तिथे एका मुलीनेदेखील आमिरबरोबर फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. ती इच्छादेखील आमिरने पूर्ण केली. त्याच्या या कृतीचे चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले आहे.

आणखी वाचा – सयाजी शिंदे यांच्या हृदयावर साताऱ्यामध्ये शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून मोठी माहिती, म्हणाले, “हृदयविकाराचा झटका येण्याआधीच…”

तसेच सलमानने देखील या ईदला चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. त्याने वांद्रे येथील ‘गॅलक्सी’ या अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये येऊन त्याने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचे अनेक चाहते बाहेर वाट पाहत होते. तो बाल्कनीत येताच सगळेजण गोंधळ घालू लागले. यामुळे परिस्थिति हाताबाहेर गेली आणि तेव्हा सर्व परिस्थिति आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान सलमानबरोबर त्याचे पिता सलीम खानदेखील होते.याबरोबरच त्याने ईदच्या मुहूर्तावरच त्याने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. दरवर्षी ईदच्या दिवशी सलमानचा नेहमी एक दर्जेदार सिनेमा प्रदर्शित होत असतो. पण यावेळी चित्रपट तर नाही पण आगामी चित्रपटाची घोषणा करुन त्याने चाहत्यांना ईदची भेट दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

खान मंडळींबरोबर पतौडी कुटुंबाची सून व बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने देखील ईद साजरी करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्य शेवयांनी भरलेली वाटी दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “ही वाटी माझी आहे. सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा”.

आणखी वाचा – “इतर मुलींसारखी मी नाही”, बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव सांगताना नोरा फतेहीचं मोठं विधान, म्हणाली, “कामाची गरज म्हणून…”

अशा प्रकारे सर्व ठिकाणी ईद आनंदात साजरी करताना पाहायला मिळाली. बॉलिवूडसहित सर्व कलाकारांनी ईदच्या शुभेच्छा  दिल्या आहेत.

Tags: amir khansalman khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
emraan hashmi and mallika shearawat

Video : २० वर्षांपूर्वीचं भांडण संपलं, इम्रान हाश्मी व मल्लिका शेरावत, व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.