‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून ‘श्री’ची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर हा नेहमी चर्चेत असतो. या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे त्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. या भूमिकेमुळे तो महाराष्ट्रातील घरा घरात पोहोचला. त्याने आतापर्यंत मालिकांबरोबर मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आला होता. आता पुन्हा एकदा तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून दिसून येत आहे. याबरोबरच तो सोशल मीडियावर देखील अधिक सक्रिय असून चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. (shashank ketkar viral video)
शशांक आपल्या सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने एका बाथरुममधील टॉयलेटच्या फ्लशबद्दल मजेशीर वाक्य बोलताना दिसत आहे.
सदर व्हिडीओमध्ये तो एका आरशासमोर उभा आहे. तिथे व्हिडीओमध्ये आजकाल कोणालापण इगो असतो यार असे म्हणत तो फ्लशच्या टॅंककडे बोट दाखवतो. ज्यावर इगो असे लिहिलेले असते आणि फ्लश करतो. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याखाली “फ्लशला इगो असून चालणार नाही!!! वांदे होतील इगो जागच्या जागी उतरवला पाहिजे, फार वाढत चालला आहे. #निव्वळ मज्जा #fun #shooting #outdoor”, असे कॅप्शन लिहिले आहे.
दरम्यान त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एक नेटकरी म्हणतो की , “वाह सर, तुमच्या क्रिएटीव्हिटिला तोड नाही”, दुसरा नेटकरी लिहितो, “काहीही ह श्री”, तिसरा नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणत आहे की, “सर तुमच्या कॉमेडीला भावपूर्ण श्रद्धांजली”, तसेच अजून एकाने म्हंटले आहे की, “तुमच्या या कॉमेडीला देखील असंच नेऊन फ्लश केलं पाहिजे” असं म्हणत त्याला ट्रोलदेखील करत आहेत.