झी मराठी वाहिनी विविधांगी विषयांवरील आधारित मालिका प्रेक्षकांसमोर घेऊन येत त्यांचे मनोरंजन करत आहे. यातली एक मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील अधिपती व अक्षराची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दरम्यान, या मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट बघायला मिळतात. त्यामुळे येणाऱ्या भागात नवीन काय बघायला मिळणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात कायमच उत्सुकता असते?
अशातच ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. नुकताच या मालिकेचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये चंचला व अक्षरा एकमेकींसमोर उभ्या ठाकणार असल्याचे दिसून येत आहे. एका परीक्षेसाठी भुवनेश्वरीने अक्षराचे नाव दिले असून या परीक्षेत दुर्गेश्वरी चंचलाचे नाव का दिले नाही म्हणून विचारते आणि यावर आधारीत हा नवीन प्रोमो आहे.
या व्हिडीओमध्ये, चारूहास अक्षराला असं म्हणतात की, “भुवनेश्वरीने या परीक्षेसाठी तुझे नाव का दिले आहे याचा विचार करण्यापेक्षा याकडे एक संधी म्हणून बघ” असा सल्ला देतात. यापुढे दुर्गेश्वरी भुवनेश्वरीला या स्पर्धेसाठी चंचलाचे नाव का दिले नाही असं बोलते. यावर भुवनेश्वरी चंचलाला हिने कधी शाळेचं तोंडही बघितले नाही असं म्हणते. मग चंचला भुवनेश्वरीला मी शाळेत व कॉलेजमध्ये गेले असून मी एक वकील असल्याचेही सांगते.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता अक्षरा व चंचला यापैकी या परीक्षेत कोण जिंकणार?, यामुळे मालिकेत काय नवीन वळण येणार? हे पाहण्यासाठी मालिकेचे आगामी भाग पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.