“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे वाक्य आपल्याला माहित असेलच. आई ही अशी व्यक्ती आहे जिचे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. त्याचबरोबर, आईचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे सांगायचं झालं तर शब्दांचीही कमतरता जाणवू लागते. आईचा वाढदिवस असेल तर तो खास झालाच पाहिजे. प्रत्येकजण आपल्या आईचा वाढदिवस खास करत असतो. असाच अभिनेत्री क्रांती रेडकरनेही तिच्या आईचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे.
सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. अभिनेत्री क्रांती रेडकर ही सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असली तर सोशल मीडियावर नानाविध कंटेट बनवत ती कायमच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. क्रांती तिच्या व्हिडीओद्वारे काही खास किस्से, गंमतीजंमती, तसेच तिच्या लेकींचे काही खास मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या आईचेही काही व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते.
असाच एक खास व्हिडीओ क्रांतीने शेअर केला आहे. नुकताच अभिनेत्रीच्या आईचा वाढदिवस झाला आणि आईच्या वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ क्रांतीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रांती आपल्या आईचे औक्षण करताना पाहायला मिळत आहे. तसेच केकही कापताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीचे वडील, नवरा यांसह परिवारातील काही सदस्यांनीदेखील सहभाग घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याने घेतले नवीन घर, दाखवली संपूर्ण झलक, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिने ‘आईसारखे दैवत’ ही कविता लावली आहे. दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच चाहत्यांनी या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये क्रांतीच्या आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.