‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७व्या पर्वाचा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला अन् डोंगरीच्या मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’च्या विजेतेपदाचा मान पटकावला. ‘बिग बॉस १७’च्या विजेत्याला म्हणजेच मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस’च्या आकर्षक ट्रॉफीसह रोख रक्कम ५० लाख रुपये व एक अलिशान कारही बक्षीस म्हणून मिळाली आहे.
‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वरच होणार याचा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता आणि अखेर चाहत्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे मुनव्वरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच अभिनेत्याचा काल (२८ जानेवारी) रोजी वाढदिवस होता आणि त्याला ‘बिग बॉस’चे विजेतेपद, आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कमेच्या स्वरुपात वाढदिवसाचे खास बक्षीसही मिळाले.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या पुढच्या सीझनमध्ये येणार अंकिताची सासू?, खुद्द सलमान खाननेचं केला खुलासा, म्हणाला, “तुम्ही जर…”
घरातून बाहेर येताच मुनव्वरने पापाराझींबरोबर त्याचा वाढदिवस साजरा केला. पापाराझींनी त्याच्या वाढदिवसानिमित्त खास केक आणला होता. तो केक कापत मुनव्वरने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याचा हा केक कापतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओखाली मुनव्वरच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसानिमित्त व ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानिमित्त कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याचे अनेक चाहते कमेंट्समध्ये मुनव्वरचे कौतुकही करत आहेत.