हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व मनाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्स. यंदाचा ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ सोहळा गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडला. ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’मध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडीने आपले वर्चस्व राखले. अभिनेत्री आलिया भट व रणबीर कपूर या जोडीने यंदाच्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’च्या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली. (Filmfare Awards 2024)
‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’मध्ये अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व अभिनेता रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. रणबीरला त्याच्या अॅनिमल या चित्रपटासाठी तर आलियाला ‘रॉकी और रानी की प्रेमकहाणी’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ’12th Fail’ हा ‘फिल्मफेअर २०२४’चा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या पुढच्या सीझनमध्ये येणार अंकिताची सासू?, खुद्द सलमान खाननेचं केला खुलासा, म्हणाला, “तुम्ही जर…”
‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ मध्ये ‘सॅम बहादूर’, ‘अॅनिमल’ या चित्रपटांनी वर्चस्व गाजवले तर शाहरुख खानचा ‘जवान’ हा सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट ठरला आहे. जाणून घ्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’च्या विजेत्यांची यादी.
सर्वोत्कृष्ट चित्रपट – 12th फेल
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) – जोरम
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणबीर कपूर (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) – विक्रांत मेस्सी (12th फेल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) – रानी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विधु विनोद चोपडा (12th फेल)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विकी कौशल (डंकी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट संवाद – इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट पटकथा – विधु विनोद चोप्रा (12th फेल)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) – अलीजेह अग्निहोत्री (फर्रे)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) – आदित्य रावल (फराज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) – तरुण डुडेजा (धक धक)
जीवनगौरव पुरस्कार – डेविड धवन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – भूपिंदर बब्बल (अर्जन वैली)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव (बेशरम रंग)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स – जवान
सर्वोत्कृष्ट कथा – अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष मखीजा (जोरम)
सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट – जवान