शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या ऐतिहासिक ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2023 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi writter director and actor digpal lanjekar shared new poster of his upcoming film shivarayancha chhava

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या ऐतिहासिक 'शिवरायांचा छावा' चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष

लेखक-दिग्दर्शक व अभिनेता दिग्पाल लांजेकरने आतापर्यंत शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची शौर्यगाथा सांगणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. आतापर्यंत त्याने ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेरशिवराज’, ‘सुभेदार’सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. या चित्रपटांतून त्याने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूर मावळ्यांची शौर्यगाथा प्रेक्षकांपुढे मांडली आहे. अशातच आता त्याने आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास चित्रपटांमधून सर्वांसमोर मांडणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पालने आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच दिग्पालने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (Digpal Lanjekar On Instagram)

“वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात” असं म्हणत दिग्पालने हा पोस्टर शेअर केला आहे. ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद व गाणीदेखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

View this post on Instagram

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

आणखी वाचा – “तुझा पहिलाच चित्रपट अन्…” लेकासाठी प्रसाद खांडेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “तुझं इंग्रजी ऐकताना…”

चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, विक्रम गायकवाड, अमित देशमुख, प्रसन्न केतकर व मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण करणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधून कलाकाराची फक्त एकांगी झलक दिसत असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेविषयी चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त सचिन खेडेकरांनी बायकोसह सिगारेट ओढतानाचा फोटो केला शेअर, म्हणाले, “माझ्या आयुष्यातील…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अशातच या नवीन पोस्टरने चाहत्यांसह शिवभक्तांची व शंभूभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्सद्वारे त्यांना हा पोस्टर आवडल्याचे म्हटले आहे. तसेच या पोस्टरमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत कोण असणार? याविषयीही पोस्ट केल्या आहेत.

Tags: digpal lanjekarentertainment newsmarathi actormarathi directormarathi entertainmentMarathi newsshivrayancha chhava
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Varada Patil Wedding

मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.