सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सिनेसृष्टीतही एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुची अडारकर-पियुष रानडे तसेच प्रसाद जवादे- अमृता देशमुख ही कलाकार मंडळी नुकतीच विवाहबंधनात अडकली. याशिवाय मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी- आशिष या जोड्या लवकरच बोहोल्यावर चढणार आहेत. एकूणच सर्वत्र लग्नाचे वारे वाहत असताना आणखी एक मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. (Varada Patil Wedding)
‘लेक माझी दुर्गा’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वरदा पाटील. छोट्या पडद्यावरून घराघरांत पोहोचलेली वरदा पाटील लग्नबंधनात अडकली असल्याचं समोर आलं आहे. वरदाने स्वतःच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. अगदी शाही थाटामाटात वरदाचा विवाहसोहळा संपंन्न झाला असल्याचं समोर आलं आहे.
वरदाने प्रणय पटेलसह लगीनगाठ बांधली असल्याचं समोर आलं आहे. वरदाच्या लग्नातील खास फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नसाठी वरदाचा ब्राईड लूक साऱ्यांच्या विशेष पसंतीस पडला. वरदाने तिच्या लग्नात लाल रंगाचा घागरा परिधान केला होता. यांत तिचं सौंदर्य अधिकचं खुलून आलेलं दिसलं. रोमँटिक पोज देत वरदाने तिच्या पतीसह फोटो शेअर केलेले पाहायला मिळाले. वरदाच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेतून वरदा छोट्या पडद्यावर झळकली. या मालिकेत वरदा मुख्य भूमिकेत असलेली पाहायला मिळाली. दुर्गा ही भूमिका ती साकारत होती. मात्र वरदाने ही मालिका अर्ध्यावरून सोडलेली पाहायला मिळाली. यावेळी वरदाने मालिका सोडल्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर मालिकेत वरदाची जागा अभिनेत्री रश्मी अनपट हिने घेतली.