मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त सचिन खेडेकरांनी बायकोसह सिगारेट ओढतानाचा फोटो केला शेअर, म्हणाले, “माझ्या आयुष्यातील…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2023 | 11:07 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi and bollywood actor sachin khedekar celebrating 30th marriage anniversary with wife jalpa khedekar photo viral on social media

लग्नाच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त सचिन खेडेकरांनी बायकोसह सिगारेट ओढतानाचा फोटो केला शेअर, म्हणाले, "माझ्या आयुष्यातील…"

अभिनेते सचिन खेडेकर हे मराठी मनोरंजसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी, तमिळ व तेलुगु या चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.  कधी रोमँटिक हिरो, कधी वडील, कधी भाऊ, तर कधी चित्रपटातील क्रूर खलनायक अशा नानाविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘कोण होणार करोडपती’सारखा शो त्यांनी होस्टदेखील केला आहे. अभिनेते सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या कामानिमित्त काही गोष्टी शेअर करत असतात. आपल्या अभिनयामुळे कायमच चर्चेत असणारे सचिन खेडेकर त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Sachin Khedekar On Instagram)

सचिन खेडेकर यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सचिन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी जल्पा खेडेकर यांच्याबरोबर शेअर केलेल्या फोटोमुळे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सचिन यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीबरोबर फोटो शेअर केला असून या फोटोत त्यांच्या तोंडात सिगारेट आहे. तसेच त्यांनी सिगारेट एकमेकांच्या तोंडाला लावली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी कमेंट्सदेखील केल्या आहेत.

आणखी वाचा – “तुझा पहिलाच चित्रपट अन्…” लेकासाठी प्रसाद खांडेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “तुझं इंग्रजी ऐकताना…”

सचिन यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असे म्हटले आहे की, “जल्पा, माझ्या आयुष्यात तू प्रकाश म्हणून आलीस. तुला ३० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला एखादी व्यक्ती तिच्या सर्व गुणांमुळे आवडते आणि काही गुणांमुळे तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम असतं. हीच एखाद्या नात्याची योग्य अशी पाककृती आहे.” सचिन यांच्या पत्नी जल्पा खेडेकर या प्रसिद्धीझोतापासून कायमच दूर राहिल्या आहेत. त्या एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत. प्रोव्हो सेंटरमध्ये त्या व्यावसायिक थेरपिस्ट सहाय्यक पदावर काम करत असल्याचे म्हटले जाते.

View this post on Instagram

A post shared by Sachin Khedekar (@sachinskhedekar)

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, पूजाही केली, संपूर्ण झलक दाखवली अन्…; म्हणाली, “बदलापूरचं घर गाठायचे तेव्हा…”

दरम्यान, सचिन यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींसह त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटोखाली कमेंट्समध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन यांनी १९ डिसेंबर १९९३ साली जल्पा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. सचिन यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट तसेच अनेक वेबसिरीजमधून काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण गेले काही दिवस ते मराठी मनोरंजनसृष्टीपासून लांब असल्यामुळे त्यांचे अनेक चाहते त्यांना पुन्हा पाहण्यासाठी आतुर आहेत.   

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainmentMarathi newssachin khedekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
marathi writter director and actor digpal lanjekar shared new poster of his upcoming film shivarayancha chhava

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या ऐतिहासिक 'शिवरायांचा छावा' चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.