मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘देवमाणूस’ फेम अभिनेता एकनाथ गीतेने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत सगळ्यांनाच दुःखद धक्का दिला. एकनाथने त्याच्या भावाच्या निधनाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या भावाने आत्महत्या केली असल्याचं त्याने स्वतःहून सांगितलं. भावाच्या आत्महत्येनंतर एकनाथ व त्याचं संपूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. (Marathi Actor Brother Suicide)
एकनाथने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याच्या भावाबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांमधली मैत्री, प्रेम दिसत आहे. भावाचं असं अचानक जाणं एकनाथच्या मनाला चटका लावून जाणारं आहे. त्याने इन्स्टाग्रामद्वारे मॅसेज लिहित त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्याची ही पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे.
एकथान म्हणाला, “आज एक आठवडा झाला तुला जाऊन. अजूनही खरं वाटत नाही. हे वाईट स्वप्न संपून जाग का येत नाही मला? असंच सतत वाटत आहे. मनाला आयुष्यभराची हुरहूर लावून गेलास रे. खूप सारे प्रश्न सोडून गेलास. कुठे शोधू मी उत्तरं? आणि उत्तरं मिळाली तरी तू नाहीस ना दिसणार परत कधीच, कुठेच”.
आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्यासह कोकणात पोहोचली गौतमी देशपांडे, माशांवर मारला ताव, साध्या लूकने वेधलं लक्ष
“फक्त भाऊ नव्हतो ना आपण मित्र पण होतो ना रे. यावेळी माझ्या जवळ व्यक्त का नाही झाला? आत्महत्या पर्याय कसा असू शकतो रे विजू? कसं जगायचं आम्ही आता तुझ्याशिवाय बाळा…” एकथानच्या या पोस्टनंतर त्याच्या भावाला कमेंटद्वारे चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.