गेले काही दिवस अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाविषयीच्या चर्चा सोशल मिडियावर चांगल्याच रंगल्या होत्या आणि अखेरीस ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. गौतमी-स्वानंद यांच्या रिलेशनबद्दल याआधी कुणालाही माहिती नव्हती. मात्र गौतमीची बहीण व अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने गौतमीच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करताच सर्वांना गौतमी-स्वानंदच्या नात्याविषयी माहिती झाली. तसेच मेहेंदीच्या दिवशी गौतमीने स्वानंद बरोबरचा खास फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. (Gautami Deshpande And Swanand Tendulkar In Kokan)
अशातच गौतमी-स्वानंद हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यांच्या लग्नाच्या, रिसेप्शनच्या फोटो व व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला. त्यांचा लग्न व रिसेप्शनच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. दोघांच्या लग्नाआधीचे व लग्नानंतरचे लूक्स चाहत्यांना विशेष आवडले. अशातच आता दोघेही त्यांच्या लग्नाच्या धावपळीनंतर कोकणात गेले आहेत.

आणखी वाचा – “राजकारण ही माझी आवड…”, राजकारणात प्रवेश करण्याबाबत माधुरी दीक्षितचा खुलासा, म्हणाली, “निवडणूक लढवणं…”
गौतमी-स्वानंद हे दोघे लग्नानंतर थेट कोकणात पोहोचले आहेत. हे दोघे ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणजेच अंकिता वालावलकरलादेखील भेटले. यावेळी त्यांनी देवबाग इथे मांसाहार जेवणावर विशेष ताव मारला. गौतमी-स्वानंदसह अंकिताने तिच्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या कोकण दौऱ्याचे काही खास क्षण शेअर केले आहेत. तसेच गौतमीने यावेळी गावातल्या चाहत्यांबरोबर काही फोटोदेखील काढले आणि गावातल्या चाहत्यांबरोबरचे बायकोचे फोटो स्वानंदने त्याच्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसला.

आणखी वाचा – ‘मदर इंडिया’ फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गौतमी-स्वानंद हे दोघे लग्नानंतर आता त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर गौतमीचे रंगभूमीवर ‘गालिब’ नावाचे नाटक सुरु आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता विराजस कुलकर्णीदेखील आहे. तर स्वानंद हा ‘भाडिपा’सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये कार्यरत आहे.