शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धमाल-मस्ती, खास पदार्थ अन्…; स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीचं रोहित राऊतने केलं थाटामाटात केळवण, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 23, 2023 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi singer and actress swanandi tikekar ashish kulkarnee kelavn by friends rohit raut juilee joglekar devdutta baji nachiket lele photos viral on social media

धमाल-मस्ती, खास पदार्थ अन्…; स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीचं रोहित राऊतने केलं थाटामाटात केळवण, फोटो व्हायरल

सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. प्रसाद-अमृता यांनी पुण्यात अगदी शाही पद्धतीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली. यानंतर सुरुची-पियुष हे दोघेही विवाहबंधनात अडकले. नुकतेच मुग्धा वैशंपायन हिच्या मोठ्या बहिणीचंही अगदी साधेपणाने लग्न पार पडले. अशातच आता गायक आशिष कुलकर्णी व गायिका-अभिनेत्री स्वानंदी टीकेकर हे दोघेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत त्यांनी प्रेम जाहीर केलं होतं. यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. (Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding)

अशातच त्यांच्या केळवणाची लगबग सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच त्यांच्या घरच्यांनी  केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर नुकतेच आशिष-स्वानंदी यांच्या मित्रपरिवाराकडून केळवण आयोजित केले होते. गायक-संगीतकार रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, संगीतकार देवदत्त बाजी, गायक नचिकेत लेले व आदिनाथ पाटकर यांनी त्यांच्या मित्रांसाठी खास केळवण आयोजित केले होते. याचे काही क्षण जुईलीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?

केळवणाचा फोटो शेअर करत तिने “केळवण पार पडले” आणि “आता फक्त ११ दिवस बाकी” असं म्हटलं आहे. यावरून स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाला फक्त काहीच दिवसच राहिले असल्याचे कळत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी कुटुंबीय, मित्रपरिवार व चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अनेकजण त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वानंदी-आशिष यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.

आणखी वाचा – Video : कोकणात स्वतःच्या गावी पोहोचली पूजा सावतं, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझं घर…”

दरम्यान, अभिनेत्री स्वानंदी टीकेकर ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, ‘अगं अगं सुनबाई…’ या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. तो ‘इंडियन आयडल’च्या गेल्या पर्वात सहभागी झाला होता. या कार्यक्रमातून त्याने अनेक उत्तमोत्तम गाणी गात रसिकश्रोत्यांची मनं जिंकली.   

Tags: ashish kulkarnientertainment newsmarathi entertainmentMarathi newsswananadi tikekarswanandi tikekar and ashish kulkarni kelvanswanandi tikekar relationship
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
pedro Henrique died on stage during live show

Video : कॉन्सर्टमध्ये स्टेजवर गाणं गात असतानाच ३० वर्षीय गायकाचा धक्कादायक मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.