आपल्या सहजसुंदर अभिनयाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी सिनेसृष्टीत ‘कलरफुल’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री तिच्या हटके फोटोमुळे कायमच चर्चेत असते. अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असते. आपल्या अभिनय व नृत्यकौशल्याने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री गेले काही दिवस तिच्या रिलेशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. (Pooja Sawant On Instagram)
अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया खास पोस्ट करत तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितले होते. पूजाने सोशल मीडियाद्वारे सिद्धेश चव्हाण बरोबरचे काही पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. ती प्रेमात पडल्याचं सांगत आयुष्यातला नवा प्रवास सुरू करत असल्याचं तिने या पोस्टद्वारे म्हटलं होतं. ती नुकतीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबासह फिरायला गेली होती. याचे खास फोटो पूजाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. “तुझ्या येण्याने माझं आयुष्य आणखी रंगीन झालं आहे” असं म्हणत तिने हे फोटो पोस्ट केले होते.
अशातच ही अभिनेत्री तिच्या गावी म्हणजेच कोकणात फिरायला गेली आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कोकणातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. “माझं घर, माझं गाव, माझं कोकण” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या गाण्याला तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गाणंही लावलं आहे. या व्हिडीओमध्ये पूजा खूपच आनंदी असल्याचेदेखील पाहायला मइलात आहे. तिन्हीसांजेला तिने हा व्हिडीओ बनवला असून या व्हिडीओमधून तिने तिच्या गावकडचे निसर्गरम्य कोकणही दाखवले आहे.
दरम्यान, पूजाने अचानक बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो शेअर केल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तिच्या अनेक चाहत्यांचा हार्ट-ब्रेक झाला असल्याचेही तिने सांगितले आहे. पण अनेकांनी पूजा-सिद्धेश यांचे अभिनंदनही केले. त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता यांचे लग्न कधी होणार? यासाठी पूजाचे अनेक चाहते वाट पाहत आहेत. अनेकांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.