मनोरंजनसृष्टीतून हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या सध्या समोर येत आहेत. बॉलिवूड अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाच्या धक्क्यातून सगळे सावरत असतानाच गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. या बातमीने संपूर्ण कलाविश्वला हादरवून टाकलं होतं. मात्र आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे. यादरम्यान जागतिक स्थरावरून एक बातमी समोर येत आहे. ब्राझीलमधील एका लाइव्ह कार्यक्रमात एका ३० वर्षीय गायकाचा मृत्यु झाला आहे. गायक गात असताना अचानक तो स्टेजवरून खाली कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याचा लाइव्ह कार्यक्रमातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.(pedro Henrique died on stage during live show)
ब्राझीलमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात गॉस्पेल गायक पेड्रो हेन्त्रिक गात होता. अचानक गाता गाता तो स्टेजवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पेड्रो हेन्त्रिक स्टेजच्या टोकावर उभा असताना दिसत आहे. गाता गाता तो स्टेजसमोरील प्रेक्षकांबरोबर मजामस्तीही करतो. त्यानंतर तो गाताना एक लांबलचक नोट घेतो आणि अचानक थांबतो. त्यानंतर कोणाला काही समजण्याच्या आत पुढच्या क्षणाला तो स्टेजवर पडतो आणि बेशुद्ध होतो. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
30-year-old singer Pedro Henrique just collapsed and died on stage.
— End Wokeness (@EndWokeness) December 14, 2023
The new normal is not normal.
pic.twitter.com/rvuCW2cpko
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकाच्या मित्राने सांगितलं की पेड्रो हेन्त्रिक या शोपूर्वी खूप थकलेला होता. गायकच्या रेकॉर्ड लेबल तोडाह म्युझिकने ‘रेडिओ ९३’ शी बोलताना सांगितलं की, “त्याला छातीत तीव्र वेदना होत होत्या. तो खरा हृदयविकाराचा झटका आला होता. पेड्रो खूप आनंदी व्यक्ती होता आणि त्याचे सगळ्यांबरोबर मैत्रीचे संबंध होते”. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांपासून कुटुंबीयांना सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
पेड्रो हेन्त्रिक याच्या पश्चात त्याची पत्नी सुइलान बॅरेटो व त्याची मुलगी झो असा परिवार आहे. गायकाची लेक याच वर्षी १९ ऑक्टोबरला जन्मली होती. तिच्या पित्याच्या जाण्यानी ती आता पोरकी झाली आहे. पेड्रोने अवघ्या तीन वर्षाचा असताना गाण्याची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने २०१५ला युट्युबवर आपल्या संगीत व्हिडीओंमधून लोकप्रियता मिळवली. २०१९ पर्यंत तो स्थानिक बँडचा भाग होता. मात्र त्यानंतर त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.