जगभरात ग्रेटा गैरविग यांचा ‘बार्बी’ चित्रपटाची क्रेझ गेल्या महिन्याभरापासून जितकी सुरु आहे. तितकाच वाद देखील सुरु आहे. कारण, हॉलिवूडमधील या बहुचर्चित चित्रपटावर अनेक देशांमध्ये बंदी घातली जात असून त्यात आता आणखी एक देशाचा समावेश झाला आहे. (Barbie Movie banned in Kuwait)
द हॉलीवूड रिपोर्टरच्या माहितीनुसार, आधी व्हिएतनाम देशाने ‘बार्बी’ चित्रपटावर बंदी घातली होती. आता या देशपाठोपाठ कुवैतमध्येही बंदी घालण्यात आली आहे. शिवाय लेबनॉन देश देखील चित्रपटावर बंदी लावण्याच्या विचारात आहे. स्थानिक माध्यमांनुसार असं म्हटलं जात आहे की, “लाफी-अल-सुबाई” या कुवैतच्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांकडून ‘समाजात अयोग्य मूल्यांचा, चूकीच्या वागणूकीचा प्रसार होणार्या काही गोष्टींचा समावेश’ असल्याचं कारण देत या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे देखील वाचा – Video : पत्नीच्या अंत्यसंस्कारादरम्यान ढसाढसा रडला सुप्रसिद्ध अभिनेता, हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं निधन, लग्नाचा वाढदिवस होता पण…
हे देखील वाचा – “सावरकरांवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला तर…” रणदीप हुड्डा-महेश मांजरेकरांच्या वादात अमेय खोपकरांची उडी, म्हणाले, “दुर्देव…”
केवळ कुवैत नव्हे, तर लेबनॉनमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निर्णयावर विचार सुरु आहे. तेथील सांस्कृतिक मंत्री मोहम्मद मोर्तडा यांनी हा चित्रपट समलैंगिकतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच कौटुंबिक घटकाचे महत्त्व कमी करून विश्वास आणि नैतिकतेच्या मूल्यांचा विरोधाभास असल्याचे सांगितले.
हे देखील वाचा – रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी ‘या’ शहरांमध्ये ऑफिस कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, तिकिटेही मिळाली फ्री
ग्रेटा गैरविग यांच्या ‘बार्बी’ चित्रपटात मार्गोट रॉबी आणि रायन गोसलिंग यांची प्रमुख भूमिका असून गेल्या २१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचदिवशी ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘ओपनहायमर’ चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. दोघांनाही संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरीही ‘बार्बी’ने बाजी मारत यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. (Barbie Movie banned in Kuwait)