Vishakha Subhedar Troll: अभिनय क्षेत्रा मुळे कलाकरांना ओळख, प्रसिद्धी मिळते. आपल्या वेगवेगळ्या व नवनवीन कामांच्या माध्यमातून हे कलाकार घराघरात पोहचतात. अशी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. गेल्या अनेक वर्षात सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत विशाखाने मराठी सिनेसृष्टीमध्ये आपलं असं स्थान निर्माण केलं आहे.(Vishakha Subhedar Troll)
अनेकदा कलाकार या टीकांना उत्तर देत नाहीत, पंरतु काहीवेळेला कलाकार देखील काही टीकांनवर सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळतात. सध्या इन्स्टाग्राम पैसे देऊन अकाउंट वेरिफाइड करून घेण्याचं म्हणजेचं ब्ल्यू टिक मिळवण्याचा प्रकार सुरु आहे.काही दिवसांपूर्वी विशाखाला इन्स्टाग्रामच ब्ल्यू टिक मिळालं. पैसे देऊन ब्ल्यू टिक मिळवण्याचा प्रकार सुरु झाला त्याच दरम्यान विशाखाचं अकाउंट इंस्टाग्रामवर वेरीफाईड झालं.
विशाखाने ट्रोलरला दिले सडेतोड उत्तर (Vishakha Subhedar Troll)
त्यावरून ट्रोलरने विशाखाच्या पोस्टवर “ब्ल्यू टिक किती रुपयाला घेतली.घेताना काही कमी करून मागितले काय?” अशी कमेंट केलेली पाहायला मिळाली. त्यावर विशाखाने स्पष्ट उत्तर दिले आहे. विशाखा म्हणाली,”नाही हो, नेमकी विकत देत होते,त्याच्या आदल्या रात्री ब्ल्यू टिक मिळाली.सुदैवी नाही तर उगाचच पैसे खर्च करावे लागले असते.थँक गॉड.आणि हे इंस्टाग्राम वाले काहीच कमी पण नाही ना करत.पण काय झालय महिना तोचं असल्याने,गैरसमज होऊ शकतो.ब्ल्यू टिक विकत घेतली नाही याचा पुरावा तुमच्या कोर्टात सादर करू शकत नाही. त्यामुळे जे घडलं ते मी आणि इंस्टाग्राम आम्हालाच माहित.आणि हे सत्य मी गीतेवर हात ठेवून सांगायला तयार आहे.बाकी आपणास काय समजायचं ते समजा “. या शब्दात विशाखाने ट्रोलरला चांगलेच सुनावले.
हे देखील वाचा : सचिन तेंडुलकर नंतर मुंबई पोलिसांनीही पाहिला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट, म्हणाले, “जेव्हा महिला पोलिस स्टेशनला येतील तेव्हा…”
चित्रपट, नाटक, मालिका, तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने देखील विशाखाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवून दिलं. परंतु सध्या सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर कलाकारांचा मोठा चाहता वर्ग असतो. या माध्यमातून चाहत्यांसोबत कलाकारांना सवांद साधता येतो. चाहत्यांना देखील त्यांचं प्रेम त्याचसोबत त्यांची टीका देखील कलाकारांपर्यंत पोहचवता येते.