बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटानंतर तेजश्री प्रधानला पुन्हा करायचं आहे लग्न, स्वतःच केलेला खुलासा, म्हणालेली, “लग्नासाठी मागण्या येत नाहीत कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 12, 2023 | 4:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress tejashri pradhan wants to marry again

घटस्फोटानंतर तेजश्री प्रधानला करायचं आहे दुसरं लग्न, स्वतःच केलेला खुलासा, म्हणालेली, “लग्नासाठी मागण्या येत नाहीत कारण...”

‘होणार सून मी या घरची’ मालिकेमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. तिने या मालिकेमध्ये साकारलेलं जान्हवी हे पात्र अजही प्रेक्षकांच्या मनात आहे. तेजश्रीला अजूनही जान्हवी या पात्रामुळे तिचे चाहते ओळखतात. या मालिकेदरम्यान तिचं खासगी आयुष्यही बरंच चर्चेत आलं होतं. अभिनेता शशांक केतकर व तेजश्रीचं खऱ्या आयुष्यातील नातं या मालिकेमुळे फुलत गेलं. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दरम्यान तेजश्री व शशांकने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र फारकाळ त्यांचं नातं टिकू शकलं नाही. आता तेजश्रीला तिच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे. (Tejashri pradhan on her marriage)

शशांक त्याच्या संसारामध्ये रमला आहे. तर तेजश्रीही तिच्या खासगी आयुष्यामध्ये खूश आहे. दरम्यानच्या पडत्या काळात तिने स्वतःला सावरत करिअरकडे लक्ष दिलं. कलाक्षेत्रात दमदार कमबॅक करत आज ती पुन्हा प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. पण तेजश्रीला आता लग्न करायचं आहे. आपलाही सुखाचा संसार असावा असं तिला वाटतं. याबाबत एका मुलाखतीमध्ये तिने स्वतःच सांगितलं होतं.

आणखी वाचा – Video : ‘ठरलं तर मग’मधील अर्जुनचा चिमुकला लेक लाटतोय चपाती, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

“लग्न कधी करणार?” असं विचारताच तेजश्री म्हणाली होती की, “लग्नासाठी मला फार काही स्थळं येत नाहीत. मी स्पष्ट बोलते. त्यामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार येतात तेव्हा आपण कोलमडून जातो. करिअर थांबवतो, ब्रेक घेतो. पण मी स्वतःला सांगितलं की, नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे. काही लोकांचा असा समज आहे की, मी खूप करिअरकडे लक्ष देते. मला बऱ्याचदा समोरच्या व्यक्तींकडून असं कळतं की, नाही नाही ती खूप करिअरकडे लक्ष देणारी मुलगी आहे”.

आणखी वाचा – जिंकलस भावा! सांगलीमध्ये जाताच गौरव मोरेची ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून अभिनेताही भारावला, सोशल मीडियावर होतंय कौतुक

View this post on Instagram

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

“खरं तर मला सांगायचा आवडेल की, कुटुंब मला खूप आवडतं. मला कुटुंब हवं आहे, मला लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या २४-२५व्या वर्षी मी तो निर्णय घेतलाही होता. हो, मला माझ्या आयुष्यामध्ये लग्न करायचं आहे आणि सेट व्हायचं आहे. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की, लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे. कारण मला बोलायला खूप आवडतं. मी पार्टी करणारी मुलगी नाही. मला कुटुंबियांबरोबर एकत्रित वेळ घालवायला आवडतो”. आता तेजश्री नेमकं लग्न कधी करणार हे पाहावं लागेल.  

Tags: marathi actressmarathi moviemarathi serialtejashri pradhan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Madhura Naik cousin died in Israel-Palestine War

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात 'नागीन' फेम मराठी अभिनेत्रीची बहीण व तिच्या पतीचा मृत्यू, व्हिडिओ शेअर करत धक्कादायक खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.