सध्या इस्रायल व पॅलेस्टाईन यांच्यात मोठा संघर्ष सुरू असून यामध्ये आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अशातच, प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री मधुरा नाईक हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मधुराची बहीण व भावोजींचा इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात मृत्यू झाला आहे. याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. (Madhura Naik cousin died in Israel-Palestine War)
‘नागीन’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या गाजलेल्या टीव्ही शोमध्ये दिसलेली मधुराची चुलत बहीण व तिच्या पतीची पॅलेस्टाईनमधील हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या मुलींसमोर निघृणपणे हत्या केली आहे. याची माहिती तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत दिला आहे. हे सांगताना अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते. तसेच, या व्हिडिओमध्ये कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला गमावल्याचे दुःख व्यक्त केले. शिवाय या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलच्या पाठीशी असल्याचे तिने सांगितले आहे.
ती या व्हिडिओमध्ये म्हणाली, “मी मधुरा नाईक, भारतात जन्मलेली एक ज्यू धर्मिय महिला आहे. सध्या भारतात केवळ ३००० ज्यू धर्मिय नागरिक उरले आहेत. ७ ऑक्टोबरपूर्वी आमच्या कुटुंबियांनी एक मुलगी आणि मुलगा गमावला. माझी चुलत बहीण ओदाया आणि तिच्या पतीला हमसच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसमोर निर्घृणपणे हत्या केली. मी आणि आमचे संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ते दुःख शब्दात सांगणे माझ्यासाठी कठीण जात आहे.”
हे देखील वाचा – घटस्फोटानंतर तेजश्री प्रधानला पुन्हा करायचं आहे लग्न, स्वतःच केलेला खुलासा, म्हणालेली, “लग्नासाठी मागण्या येत नाहीत कारण…”
ती पुढे म्हणते, “आज मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्यासमोर आले. आजवर तुम्ही मला खूप सारं प्रेम दिलं, पाठिंबा दिला, माझं कौतुक केलं. मात्र, आता मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आज इस्रायल दुःखात असून हमासच्या या आगीत अनेक महिला, लहान मुले व वृद्ध लोक जळत आहेत. त्यांना टार्गेट केलं जात आहे. कालच माझ्या बहिण, भावोजी व त्यांच्या मुलांचे फोटोज शेअर केले होते. जेणेकरून जगाला आमच्या वेदना कळू शकेल. तसेच, मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की पॅलेस्टाईन समर्थक कश्याप्रकारे अपप्रचार करत आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की, त्यांचा हा अपप्रचार अतिशय चुकीचा आहे. स्वसंरक्षण म्हणजे दहशतवाद नाही. तसेच, मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेला पाठिंबा देत नसून या कठीणप्रसंगी आपण इस्रायलमधील नागरिकांच्या पाठीशी उभे राहावे.”, असे आवाहन केले आहे.
हे देखील वाचा – Video : ‘ठरलं तर मग’मधील अर्जुनचा चिमुकला लेक लाटतोय चपाती, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
मधुराने ‘प्यार की ये एक कहानी’, ‘हमे ली है शपथ’, ‘नागिन’, ‘उतरन’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’सह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. याआधी बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने इस्रायलहून मायदेशी परतल्यानंतर तिथल्या हल्ल्याचा विदारक अनुभव शेअर केला होता.