स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या या मालिकेने अवघ्या कमी कालावधीत टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुन या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. अभिनेता अमित भानुशाली या मालिकेत अर्जुन सुभेदार हे पात्र साकारताना दिसत असून त्याचं हे पात्र प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. विशेष म्हणजे, अमितने या मालिकेतून तब्बल ९ वर्षांनंतर मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे. (Amit Bhanushali’s Son video)
अभिनयाबरोबरच अमित सोशल मीडियावर सक्रिय असून तो त्याच्या सेटवरील आठवणींबरोबर खासगी आयुष्यातील अनेक क्षण त्यांच्या चाहत्यांसह शेअर करतो. अभिनेत्याचा नुकताच शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. अमितला हृदान नावाचा मुलगा आहे. त्याचं आणि हृदानचं सुंदर बॉण्डिंग नेहमीच त्यांच्या चाहत्यांना भारावून जातं. अशातच, अमितच्या मुलाचा एक व्हिडिओ समोर आला, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – जिंकलस भावा! सांगलीमध्ये जाताच गौरव मोरेची ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून अभिनेताही भारावला, सोशल मीडियावर होतंय कौतुक
अमितच्या पत्नीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून ते शेअर करताना तिने “मास्टरशेफ” असं कॅप्शन दिलं आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, अमितची पत्नी हृदानला पिठाचा एक तुकडा देते. त्या तुकड्यावर तो निरागस हातांनी चपाती लाटताना दिसतो. हा व्हिडिओ अमितलाही प्रचंड आवडला असून तो या व्हिडिओवर कमेंट करत त्याचं कौतुक केलं. त्याचबरोबर चाहत्यांनीदेखील अमितच्या लेकाचे भरभरून कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – Video : ८७व्या वर्षी धर्मेंद्र यांचं सायकल वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण, म्हणाले, “तुमच्यासारखे…”
गेली अनेक वर्ष मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अमित ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या शूटमध्ये व्यग्र आहे. सध्या मालिकेत एक गोड ट्रॅक पाहायला मिळत आहे. सायलीवर झालेल्या हल्ल्यानंतर अर्जुन व सायलीचं नातं आता आणखी अधिक घट्ट होताना दिसत आहे. इतकेच नव्हे, तर सायलीला आपली बायको म्हणून स्वीकारण्यास तो तयार झाला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना यामध्ये आणखी काय पाहायला मिळेल, याची उत्सुकता लागली आहे.