गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घोडबंदर रोडची वाईट अवस्था, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रवास करताना भडकली, रात्रीचं शूट करुन दोन तासाने घरी पोहोचली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 25, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rupali bhosale video on road bad condition

घोडबंदर रोडची वाईट अवस्था, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रवास करताना भडकली, रात्रीचं शूट करुन दोन तासाने घरी पोहोचली अन्...

राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काही अंशी शहरात काम करणाऱ्या प्रत्येकाचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कामासाठी करावा लागणारा प्रवास प्रचंड पावसामुळे त्रासदायक ठरत आहे. शिवाय रेल्वेही उशीराने धावत असल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. मुंबई सारख्या शहरात तर रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. पावसामुळे ट्राफिक आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे अनेकांना गैरसोय होत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळींचंही असंच काहीसं आहे. कलाकार मंडळींनाही नेहमीच्या शूटसाठी प्रवास करत असताना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ अभिनेत्री रुपाली भोसलेने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. (rupali bhosale video on road bad condition)

घोडबंदर रोड, त्यामार्गाने जायचे रस्ते याविषयी कलाकार नेहमीच तक्रार करतात. कधी कधी तर तीन तीन तास प्रवास करुन सेटवर पोहोचावं लागतं. यामागे खराब रस्ते, ट्राफिक अशी अनेक कारणं आहेत. पाऊस पडल्यानंतर तर त्याहूनही परिस्थिती अगदी वाईट. रुपालीलाही या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. याबाबत तिने व्हिडीओ शेअर केला आहे. रुपाली गाडी चालवत आहे. पण गाडी चालवत असताना तिने रस्त्यांची अवस्था दाखवली आहे.

आणखी वाचा – “मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?”, केतकी चितळेचं वादग्रस्त विधान, म्हणाली, “तुमची असुरक्षितता…”

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

रुपालीने व्हिडीओद्वारे दाखवलेली अवस्था खूपच भयावह आहे. रुपाली म्हणाली, “काय अवस्था आहे?. किती वर्ष झाली हा असा प्रवास करायचा?. आई कुठे काय करते ही मालिका करत असताना जवळपास ५ वर्ष मी विरारहून इथे यायचे. तेव्हाही अशीच परिस्थिती होती. आजसुद्धा तसंच आहे. रात्रभर शूट करुन सकाळी ५.३०ला घरी निघाले. या घोडबंदर रोडला आधी ट्राफिक नंतर हा सुंदर रस्ता. १२ ते १४ तास शूट आणि त्यानंतर दोन तास हा असा प्रवास. हे सगळं कधी नीट होणार?”. रुपालीने तिच्या पोस्टद्वारे प्रशासनालाच संतप्त सवाल केला आहे.

आणखी वाचा – “आमच्या समोर टिकायची लायकी नाही”, मॉडर्न कॉमेडीयन्सच्या अश्लील विनोदांवर जॉनी लिव्हर भडकले, म्हणाले, “खरी परीक्षा…”

रुपालीने व्हिडीओ शेअर करत एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस, नितीन गडकरी यांना टॅग केलं आहे. तसेच रुपालीच्या या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मनसे जिंकवा महाराष्ट्र वाचवा, काहीच बोलायचं नाही कारण महायुती सरकार ते आपलं सरकार, अच्छे दिन बाकी काही नाही हो, असं वाटतं रथच चालवत आहोत, याला २०१४ नंतरचा विकास म्हणतात अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Bihari youth viral video

"जन्मभूमी बिहार, जिल्हा भोजपुरी…", परप्रांतीय तरुणाने जिंकली महाराष्ट्रीयांची मनं, म्हणाला, "भारताचा इतिहास मराठ्यांशिवाय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.