मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?”, केतकी चितळेचं वादग्रस्त विधान, म्हणाली, “तुमची असुरक्षितता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 25, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ketaki Chitale controversial Statement

"मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?", केतकी चितळेचं वादग्रस्त विधान, म्हणाली, "तुमची असुरक्षितता…"

Ketaki Chitale controversial Statement : सध्या राज्यात मराठी-हिंदी असा वाद सुरु आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल, अशी मनसे, ठाकरे गट तसेच इतर पक्षांचीही भूमिका आहे. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळेही राज्यात भाषेविरोधात वाद पेटला होता. मराठी-हिंदी भाषेच्या वादावर अनेक कलाकार मंडळींनी आपापली मत मांडली. अशातच या प्रकरणाच्या विरोधात जात अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त विधान केलं आहे. मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? असा सवाल तिने थेट सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केला आहे. तर केतकीची ही पोस्ट पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल टिप्पणी केली आहे. अभिनेत्रीने म्हटलं, “आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया. अभिजात हा संस्कृत शब्द आहे, जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे, स्वतंत्र असायला पाहिजे. दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे. हा जो काही क्रायटेरिया होता तो २०२४ मध्ये काढण्यात आला. मराठी, बंगाली आणि आसामी या भाषांनासुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला. पण वैयक्तिकरित्या, मी याच्या विरोधात आहे. जर तुम्हाला अभिजात दर्जा द्यायचा असेल तर तो सगळ्याच भाषांना द्या,” असं केतकी चितळे म्हणाली.

आणखी वाचा – “मी वडिलांची भूमिका नाही बजावत”, सावत्र मुलासह असं आहे अनुपम खेर यांचं नातं, स्वतःच केला खुलासा, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

पुढे केतकीने हिंदी व उर्दू भाषेला अभिजात दर्जा नसण्याबद्दल विधान करत म्हटलं, “माझ्या एका जवळच्या व्यक्तीने मला असं म्हटलं की हिंदी आणि उर्दूलासुद्धा अभिजात दर्जा नाही. त्यामुळे त्यांनीसुद्धा भांडायला पाहिजे. मला असं वाटलं की फक्त दर्जा हवा म्हणून ते का भांडतील? यातून फक्त तुमची असुरक्षितता दिसून येते. दर्जा मिळाला, पण त्यामुळे काय झालं? आम्हाला दर्जा पाहिजे, दर्जा पाहिजे, असं म्हणून तुम्ही तुमची असुरक्षितता दाखवत आहात”, असं केतकी म्हणाली.

आणखी वाचा – “आमच्या समोर टिकायची लायकी नाही”, मॉडर्न कॉमेडीयन्सच्या अश्लील विनोदांवर जॉनी लिव्हर भडकले, म्हणाले, “खरी परीक्षा…”

पुढे ती म्हणाली, “मराठीत बोल-मराठीत बोल, मराठी येत नाही. अरे.. तो बोलेल नाहीतर नाही बोलणार, त्याने काय मराठी भाषेचं नुकसान होतंय का? भोकं पडतायत का? नाही ना. तुम्ही तुमची स्वतःची असुरक्षितता दाखवताय. त्याने काय फरक पडतो? कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही”.

Tags: ketaki chitalemarathi actressmarathi language fight
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
rupali bhosale video on road bad condition

घोडबंदर रोडची वाईट अवस्था, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रवास करताना भडकली, रात्रीचं शूट करुन दोन तासाने घरी पोहोचली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.