बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जन्मभूमी बिहार, जिल्हा भोजपुरी…”, परप्रांतीय तरुणाने जिंकली महाराष्ट्रीयांची मनं, म्हणाला, “भारताचा इतिहास मराठ्यांशिवाय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 25, 2025 | 3:00 pm
in Social
Reading Time: 3 mins read
google-news
Bihari youth viral video

"जन्मभूमी बिहार, जिल्हा भोजपुरी…", परप्रांतीय तरुणाने जिंकली महाराष्ट्रीयांची मनं, म्हणाला, "भारताचा इतिहास मराठ्यांशिवाय…"

Bihari youth viral video : संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्‍वर म्हणाले, ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।। असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली. पण आज हीच मराठीची महती कुठेतरी पुसत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करताच हे प्रकरण चांगलंच पेटून उठलं. दरम्यान, मनसे पक्षाने आणि इतर पक्षाने यांत डोकावताच या प्रकरणाला वादाचं रूप मिळालं. सोशल मीडियावर तर हिंदी भाषिक लोकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच, सोशल मीडियावर हिंदी भाषिक इसमाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रात राहून मराठी ही यायलाच हवी, नसेल येत तर माज दाखवू नये असं म्हणत या परप्रांतीयाने अनेकांची मनं जिंकली.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तो तरुण सांगत आहे की, “महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. जन्मभूमी बिहार, जिल्हा भोजपूर आहे. मी सत्याच्या बाजूने आहे. महाराष्ट्रात कमावत आहे, खात आहे, राहात आहे तर मग मराठी बोलायला हरकत काय आहे? चार लोकांचा सन्मान करायाला हरकत काय आहे? चार लोकांचा मान ठेवून मला चार गोष्टी मिळत असतील त मी त्याच गोष्टींकडे लक्ष देईल. मराठी माणूस तुमच्याकडे येत असेल आणि मराठी बोलण्याचा आग्रह करत असेल तर एवढंच बोलायचं आहे की, हा दादा, जय शिवराय. मग बघा मराठी माणूस तुमच्याबरोबर किती चांगलं वागेन”.

आणखी वाचा – “आमच्या समोर टिकायची लायकी नाही”, मॉडर्न कॉमेडीयन्सच्या अश्लील विनोदांवर जॉनी लिव्हर भडकले, म्हणाले, “खरी परीक्षा…”

View this post on Instagram

A post shared by Vibes of People (@vibes_of_people)

पुढे तो म्हणाला, “उत्तर भारतीय नंतर आधी मी भारतीय आहे आणि भारताचा इतिहास मराठ्यांशिवाय अपूर्ण आहे मग त्यांच्या बाजूने का उभे राहू नये. मला कधी मराठीमुळे कोणताही धोका वाटला नाही. मुद्दाम खोटी माहिती पसरवली जाते की, मराठी लोक यूपी, बिहारी लोकांना मारतात, त्यांच्या धर्माच्या वाटेला गेला तर ते कोणाचेच नाही. मराठी त्यांची आई आहे, आईला त्रास दिला तर ते बरोबर अद्दल घडवतात. त्यांना सांगा की, मी मराठी शिकत आहे. मराठीचा सन्मान करत आहे. विरोध नाही करत, विरोध करू नका, विरोध केला तर मनसेचे लोक तुम्हाला विरोध करतील. मराठीला विरोध केला तर मीरा रोडमध्ये राहणे देखील अवघड होईल. मी देखील मीरा रोडमध्ये राहतो, मी देखील हिंदी बोलतो. मी बिहारचा मुलगा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो. मराठी भाषा त्यांची आहे”.

आणखी वाचा – “मी वडिलांची भूमिका नाही बजावत”, सावत्र मुलासह असं आहे अनुपम खेर यांचं नातं, स्वतःच केला खुलासा, म्हणाले…

जेव्हा मुलाखत घेणारा व्यक्ती त्या बिहारी तरुणाला विचारतो की, “तुम्हाला वाईट अनुभव आला आहे का?”. त्यावर तो उत्तर देतो की, “तुमच्यासमोर उभं राहून एक बिहारी मुलगा बोलत आहे हे मुंबईचे मोठ मनं आहे. हे मराठी माणसांच्या मनाचा मोठेपणा आहे”. अर्थातच या परप्रांतीय तरुणाचा व्हिडीओ मनं हेलावणारा आहे.

Tags: bihari youthmarathi languageviral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
soha ali khan diet

तीन महिन्यांपासून सोहा अली खान रिकाम्या पोटी पितेय हे खास ज्यूस, डाएट पाहून व्हाल थक्क, कच्ची लसूण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.