मराठी सिनेसृष्टीतील गोड जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे उमेश-प्रिया. या जोडप्यानं फक्त मालिकांमधूनच नाही तर नाटक, चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ही जोडी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध ठिकाणी एकत्र प्रवास करत ते फोटो चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. आताही प्रियाने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आज उमेशचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त प्रियाने त्याचे खास फोटो शेअर करत सुंदर कॅप्शन लिहीलं आहे. त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. (Priya bapat share a special post for umesh bapat)
प्रियाने फोटोंना कॅप्शन देत लिहीलं की, “माझा गोड उमेश, तू माझ्या आयुष्यात असणं हे माझासाठी सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे. तू माझा गुन्ह्यांमधील भागीदार आहेस. मला कसं छेडावं आणि पुन्हा कसं प्रेमाने मनवायचं हे तुला बरोबर माहित आहे. अशा गोड, खूप त्रास देणाऱ्या व माझ्यावर अमर्याद प्रेम करणाऱ्या माझ्या जगाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असं कॅप्शन लिहीत तिने उमेशच्या गोड क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या पहिल्या फोटोत उमेश-प्रिया हसताना दिसत आहेत. फोटोबाबत प्रिया लिहीते, “हा फोटो आयुष्यभराच्या एकत्रित बंधांचा आहे”. दुसऱ्या फोटोमध्ये प्रिया उमेशबरोबर खोडकरपणा करताना दिसते. त्यात ती लिहीते, “तुला अशीच मी खेळकररीत्या चिडवत राहेन आणि तू नेहमी आनंदी राहशील अशी मी आशा करते”. तिसरा हा व्हिडीओ आहे ज्यात उमेश व प्रिया एकत्र नाचताना दिसत आहे. या व्हिडीओसाठी ती लिहीते, “आपला वेडेपणा सदैव असाच राहू दे”. चौथ्या फोटोमध्ये प्रिया उमेशच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत बसलेली दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देत ती म्हणते, “सगळ्या कठीण परिस्थितीत नेहमी तुझ्याबरोबर राहायचं आहे”. पाचव्या फोटोंत प्रसादचे बाबा त्यांचं औक्षण करताना दिसत आहेत. त्या फोटोसाठी ती लिहीते, “पालकांचे आशिर्वाद सदैव तुझ्यावर आहेत”. सहाव्या फोटोंत प्रसाद एका गोड मुलीबरोबर दिसत आहेत. ज्यात ते दोघेही हसताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देत ती लिहीते, “तू शरिवाचा सर्वात आवडता व्यक्ती आहेस”. तर सातव्या फोटोमध्ये त्यांच्या कुटुंबाचा सर्वात जुना फोटो आहे. ज्यात प्रसादचे आई-बाबा आणि परिवार पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत ती लिहीते, “आई-बाबांचा तुझ्यावर सदैव लक्ष आहे. तू मिळवत असलेल्या यशाबद्दल त्यांना तुझं नेहमीच कौतुक आहे”, असं लिहीत तिने पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया व उमेश गेली बरीच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या त्यांचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक चांगलंच गाजत आहे. या नाटकाचे परदेशातही बरेच प्रयोग झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी त्यांनी ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या नाटकालाही प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला होता. आताही त्यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून बरं प्रेम मिळत आहे.