मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नवऱ्याबरोबर ‘बिग बॉस’मध्ये जाऊ नकोस”, चाहतीने सल्ला देताच सोनाली कुलकर्णीचे उत्तर, म्हणाली, “तिथे कधीच…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 12, 2023 | 4:13 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress sonalee kulkarni talk about bigg bos entry with husband on her fan question

"नवऱ्याबरोबर 'बिग बॉस'मध्ये जाऊ नकोस", चाहतीने सल्ला देताच सोनाली कुलकर्णीचे उत्तर, म्हणाली, "तिथे कधीच..."

आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हणून सोनालीने चाहत्यांच्या मनात तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. आपले अनेक मनमोहक फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती अनेकदा तिची मतेही सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत असते. अशातच तिला एका चाहतीने विचारलेल्या प्रश्नाला चोख उत्तर दिले आहे. (Sonalee Kulkarni On Instagram)

सोनालीने तिच्या साडीमधले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. हे फोटो शेअर करत सोनालीने लिहिलं आहे, “Being वेरी मच इंडियन in dubai” असं म्हटलं आहे. तिच्या या फोटोखाली अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. “खूप छान, खूप सुंदर, तु नेहमीसारखीच सुंदर दिसत आहेस, मस्त, पैठणीचा रंग खूप छान आहे, खतरनाक” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. सोनाली अनेकदा तिच्या पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत असते.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तीन वर्ष तू माझ्यासाठी…”, विकी जैन बायकोला देत असलेली वागणूक प्रेक्षकांनाही पटेना, अंकिता लोखंडेला रडू कोसळलं, म्हणाली, “मी सगळं…”

यातील अनेक चांगल्या कमेंटपैकी एका कमेंटने सोनालीसह अनेकांचेच लक्ष वेधून घेतले. एका चाहतीने सोनालीला कमेंट करत “काहीही कर पण ‘बिग बॉस’मध्ये नवऱ्याबरोबर जाऊ नकोस.” असं विचारलं. तिच्या या कमेंटला उत्तर देत सोनालीने “मी कधीच एकटी पण जाणार नाही” असं म्हटलं आहे. यामुळे सोनाली भविष्यात कधीही बिग बॉसमध्ये जाणार नसल्याची शक्यता तिने सांगितली आहे. सोनालीच्या या उत्तराने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

आणखी वाचा – Video : आर्या आंबेकरची मोठी फसवणूक, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप, म्हणाली, “माझ्या परवानगीशिवाय त्यांनी…”

दरम्यान, सध्या ‘बिग बॉस’चे १७वे हिंदी पर्व चांगलेच गाजत असून यातील अनेक जोड्यादेखील चांगल्याच चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर सोनालीला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अभिनेत्रीने नकळत भाष्य केले आहे. सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच दाक्षिणात्य चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘मलाइकोकटाई वालीबन’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर काम करणार आहे.

Tags: entertainmententertainment newsmarathi actressMarathi newssonalee kulkarni
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : विकी जैनला नको नको ते बोलला अभिषेक, नवऱ्याचा झालेला अपमान पाहून भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली, "तू वयावरुन… "

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.