‘कॉफी विथ करण ८’ च्या चिट चॅट शो सध्या चांगलाच गाजत आहे. या शोच्या प्रत्येक भागात बॉलिवूडचे कलाकार मंडळी हजेरी लावतात. सध्या हा शो प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसतो आहे. सुरुवातीला या कार्यक्रमात जोडप्यांनी हजेरी लावली होती. ज्यांनी या शोमध्ये एकमेकांबद्दलची बरीच रहस्य उघड केली. आता करणच्या शोमध्ये अभिनेता अर्जुन कपूर व आदित्य कपूर यांनी हजेरी लावली आहे. यावेळी आदित्यला अनन्या पांडेला डेट करत असल्याबाबत प्रश्न विचारला. यावर त्याने दिलेलं उत्तर सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. (aditya roy Kapoor beaks silence)
नुकताच या शोचा प्रोमो समोर आला आहे. अभिनेता अर्जुन व आदित्य एकमेकांची चांगलीच चेष्ठा-मस्करी करत खेचाखेची केली. यामध्ये करणनेही पुढाकार घेतला. त्याने आदित्यला या शोवर बोलवल्याचा चांगलाच फायदा उटलला. यावेळी करणने आदित्यला त्याच्या मनात असलेला प्रश्न विचारला. अनन्याला डेट करत असल्याबाबतचा प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्यने त्या प्रश्नाचं उत्तर अतिशय हुशारीनं देत हा प्रश्न चांगलाच फिरवला. करणने आदित्यला अनन्याला डेट करत असल्याबाबत प्रश्न विचारला. मात्र त्यावर जे उत्तर मिळालं त्याची करणने अपेक्षितही नव्हतं. यावेळी आदित्य म्हणाला, “मला कोणतीही गुपितं विचारु नको, मी तुला खोटं सांगण्याशिवाय दुसरं काहीही सांगणार नाही”, असं उत्तर देत त्याने करणची बोलती बंद केली.
या शोच्या प्रश्नोत्तराच्या फेरीत करण अर्जुनला विचारतो की, “जर तू अभिनेत्री श्रद्धा कपूर व अनन्या पांडेबरोबर लिफ्टमध्ये अडकलास तर तू काय करशील?” यावर अर्जुन उत्तर देत सांगतो की, “नक्कीच मी प्रेम केलं असतं. पण ते कोणाबरोबर केलं असतं हे माहित नाही”. या उत्तरावर आदित्य अर्जुनकडे आश्चर्याने पाहतो तेव्हा तो अनन्याच्या वडिलांची चंकी पांडेची नक्कल करत म्हणातो, “मी विनोद करत आहे”, असं सांगत त्याने विनोदी अंदाजात उत्तर दिलं.
‘कॉफी विथ करण ८’च्या शेवटच्या भागात अभिनेता विकी कौशल व कियारा अडवाणी आले होते. यावेळी या दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील रंजक किस्से शेअर केले होते. याअगोदर या शोमध्ये आलिया भट्ट, करीना कपूर खान, राणी मुखर्जी व काजोल यांनी या शोमध्ये हजेरी लावली.