बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या अभिनयातून सगळ्यांचं मनं जिंकलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून ७०-८०चं दशक बरंच गाजवलं होतं. त्यांचा शुक्रवारी ८ डिसेंबरला ८८ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या निमित्ताने त्यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्यासाठी बऱ्याच चाहत्यांनी खास भेटवस्तू पाठवले होते. त्यांच्यासाठी खास भेटवस्तूही पाठवल्या. चाहत्यांकडून मिळणारं हे प्रेम पाहता धर्मेंद्र भारावून गेले आहेत. त्यांनी सकाळी (९ डिसेंबर) खास व्हिडीओ शेअर करत त्या सगळ्या चाहत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. चाहत्यांनी दिलेले भेटवस्तू पाहता धर्मेंद्र बरेच भावूक झालेले पाहायला मिळाले. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. (Dharmendra goes emotional in video)
शेअर केलेल्या व्हिडीओत धर्मेंद्र यांनी गुलाबी रंगाचा फेटा घातला होता. तो फेटा त्यांना त्यांच्या चाहत्यांनी भेट म्हणून दिला होता. तर त्यांच्या हातात एका सुंदर फुलाची छोटी कुंडी पाहायला मिळाली. या वयातही त्यांना मिळणारं प्रेक्षकांचं भरभरून प्रेम पाहता व्यक्त होत धर्मेंद्र भावूक झाले होते. चाहत्यांना धन्यवाद देताना त्यांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. व्हिडीओत धर्मेंद्र सांगतात, “मित्रांनो, अशा सुंदर भेटवस्तू मला सगळीकडून अगदी गावागावांतून आल्या आहेत. हा फेटाही मला भेट म्हणून मिळाला आहे. मी तो घालूनही बघितला. या सगळ्यात तुम्हा सगळ्यांचं प्रेमच प्रेम आहे. खूप छान वाटतं. तुम्ही सगळे आनंदी राहा, जसं आता प्रेम देता तसंच प्रेम माझ्यावर करत राहा. मी पण तुमच्यावर मनापासून प्रेम करतो”, असं सांगत धर्मेंद्र भावनिक झाले होते.
Friends, love you all for your loving response on my Birthday ????. pic.twitter.com/rmujvLrHjF
— Dharmendra Deol (@aapkadharam) December 9, 2023
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहीलं, “मित्रांनो, माझ्या वाढदिवसादिवशी तुम्ही दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा हे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे”. शुक्रवारी, त्यांच्या मुलाने म्हणजेच अभिनेता सनी देओलने त्यांच्या चाहत्यांबरोबर केक कापत त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. अभिनेत्री हेमा मालिनीपासून मुलगी ईशा देओल, सनी देओल यांनी खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या वाढदिवसाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातील धर्मेंद्र व हेमाजी यांनी छान पोज देत फोटो काढला होता. तर दुसऱ्या फोटोत हेमा मालिनी धर्मेंद्र यांना प्रेमाने जवळ घेताना दिसल्या आणि किस करताना दिसल्या. अशा थाटामाटात धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा झाला.