मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या अभिनयातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेली आहे. नाटक, मालिका, चित्रपट व ओटीटी या सर्वच माध्यमांत तिने उत्तम काम केलं आहे. ज्यात तिने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चा होत असते. शिवाय तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं असून तिच्या फोटोशूट्सची सतत चर्चा होत असते. केवळ मराठीच नाही, तर हिंदी ओटीटी व चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची वेगळीच छाप पाडली आहे. अभिनेत्री काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली असून तिची ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती. आता या वेबसीरिजनंतर ती बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासह मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. (Priya Bapat new movie with Nawazuddin Siddiqui)
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली प्रिया लवकरच एका बायोपिक मध्ये दिसणार आहे. ज्यात ती लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. प्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सेटमधील काही फोटोज शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. शेअर केलेल्या या फोटोजमध्ये तिच्यासह अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, दिग्दर्शिका सेजल शाह व निर्माते विनोद भानुशाली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हातात चित्रपटाच्या नावाचा क्लॅप दिसत आहे. यावेळी तिने केलेला लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – “सुख म्हणजे…” मालिकेतील जुने कलाकार आऊट तर नवीन कलकार इन, मराठीतील ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची दमदार एन्ट्री
चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दलची एक पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत ही माहिती दिली आहे. तर प्रियाने तिच्या अकाऊंटवर काही स्टोरीज शेअर केली. यातील पहिल्या स्टोरीमध्ये या अद्भुत प्रवासासाठी आपण उत्सुक असल्याचं ती सांगितली. तर, दुसऱ्या स्टोरीमध्ये ती नवाजुद्दीन सिद्दीकी सर, तुमच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी सन्मान असल्याचं म्हणाली. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून चाहत्यांसह कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर, तिचा पती उमेश कमतने या नव्या प्रोजेक्टसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
हे देखील वाचा – अमोल कोल्हे ‘ऑन ऍक्शन मोड’, एसटीतून प्रवास केल्याने नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “निवडणुका आल्यामुळे…”
प्रियाचा हा चित्रपट कस्टम अधिकारी कोस्टा फर्नांडिज यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्याचं दिग्दर्शन ‘सिरीयस मॅन’ फेम दिग्दर्शिका सेजल शाह करणार असून विनोद भानुशाली हे चित्रपटाची निर्मिती करत आहे. अभिनेत्री यात कोणती भूमिका साकारणार आहे? हे मात्र समोर आलं नाही. पण चाहत्यांना तिच्या या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता लागली आहे.