शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सुख म्हणजे…” मालिकेतील जुने कलाकार आऊट तर नवीन कलकार इन, मराठीतील ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची दमदार एन्ट्री

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 21, 2023 | 4:07 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेचा नुकताच नवीन भाग सुरू झाला आहे. शिर्के कुटुंबाचा अंत झाला असून मालिकेतील जयदीप-गौरी यांचा पुनर्जन्म दाखवण्यात आला आहे. ही मालिका आता तब्बल २५ वर्ष पुढे सरकली आहे. या सगळ्यात मालिकेतील काही जुन्या पात्रांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे आणि त्यामुळे नवीन पात्रांची एण्ट्री झाली आहे. (Harshada Khanvilkar And Amey Barve’s Entry In Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial)

मालिकेच्या या नवीन भागात ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील वैभव अर्थात अभिनेता अमेय बर्वेची एण्ट्री होणार आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेबद्दल अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण तो या मालिकेतून एका महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री नंदिता पाटकर, ज्ञानदा रामतीर्थकरसह त्याच्या अनेक चाहत्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अमेयला या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – निसर्गाच्या सानिध्यात ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बांधलं स्वतःचं घर, म्हणाली, “देवाला, नशिबाला दोष देतो पण…”

अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचीही या मालिकेत धमाकेदार एण्ट्री होणार आहे. यात हर्षदा सरपंचाच्या भूमिकेत दिसणार असून वसुंधरादेवी अहिरराव असं त्यांच्या भूमिकेचं नाव आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा या मालिकेतील त्यांची भूमिका हटके असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Amey Barve (@ameybarve1212)

आणखी वाचा – अमोल कोल्हे ‘ऑन ऍक्शन मोड’, एसटीतून प्रवास केल्याने नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “निवडणुका आल्यामुळे…”

दरम्यान नुकताच या मालिकेचा नवीन भाग प्रेक्षकांसमोर आला आहे. याआधीच्या भागाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता या नवीन भागासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच अमेय, हर्षदा यांव्यतिरिक्त आणखी काही कलाकारांचीही या मालिकेत एंट्री होणार आहे. त्यामुळे आता हे नवीन कलाकार कोण? याविषयीदेखील चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे.

Tags: amey barveentertainment newsharshada khanvilkarmarathi actormarathi actressmarathi entertainmentmarathi serialsukh mhanje nakki kaay asta
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Prithvik Pratap On Australia

"ऑस्ट्रेलियाने इथं येऊन आपल्याला हरवलं", भारताच्या पराभवानंतर पृथ्वीक प्रतापची पोस्ट, म्हणाला, "तिथं जाऊन त्यांची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.