सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमृता देशमुखच्या मंगळसूत्राच्या डिझाइनची जोरदार चर्चा, तर नवऱ्याने बायकोच्या नावाचं घातलेलं युनिक लॉकेट ठरलं लक्षवेधी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 21, 2023 | 4:54 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage

अमृता देशमुखच्या मंगळसूत्राच्या डिझाइनची जोरदार चर्चा, तर नवऱ्याने बायकोच्या नावाचं घातलेलं युनिक लॉकेट ठरलं लक्षवेधी

Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : कलाकार मंडळींनी एखादी हटके फॅशन केली की त्यांचे चाहते ही ती फॅशन फॉलो करतात. कपडे, दागिने अशा वेगवेगळ्या फॅशन ही कलाकार मंडळी करत असतात. आणि या फॅशनने ते प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. अशातच पुन्हा एकदा एका हटके स्टाईलच्या मंगळसूत्राची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात नववधूच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या डिझाइनने ही चर्चा सुरू झाली आहे. आणि या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळालं.

मराठी मनोरंजन विश्वातील क्युट कपल अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. शनिवार (१८ नोव्हेंबर) रोजी या जोडीचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अमृता-प्रसादच्या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडलेल्या यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.

आणखी वाचा – “ऑस्ट्रेलियाने इथं येऊन आपल्याला हरवलं”, भारताच्या पराभवानंतर पृथ्वीक प्रतापची पोस्ट, म्हणाला, “तिथं जाऊन त्यांची…”

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

प्रसाद-अमृताचा लग्नातील लूक प्रचंड व्हायरल झाला. लाल लेहेंग्यामध्ये नव्या नवरीचं रूप खुलून आलं होतं. तर प्रसादच्या पारंपरिक कुर्त्यावरही नजर रोखून राहिली होती. याशिवाय प्रसाद-अमृताच्या लग्नातील आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे अमृताचं मंगळसूत्र. अमृताच्या गळ्यातील नाजूक असं दोन वाट्यांचं मंगळसूत्र अन् त्याला असलेला पारंपरिक टच साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. अमृताच्या गळ्यात प्रसादने जरी मंगळसूत्र घातलं असलं तरी प्रसादनेही अमृताच्या नावाचं लॉकेट स्वतःच्या गळ्यात घालून साऱ्यांची मनं जिंकली. अमृताच्या मंगळसूत्राहून प्रसादच्या लॉकेट भाव खाऊन गेलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

आणखी वाचा – “सुख म्हणजे…” मालिकेतील जुने कलाकार आऊट तर नवीन कलकार इन, मराठीतील ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची दमदार एन्ट्री

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

प्रसाद-अमृताच्या लग्नसोहळ्याबरोबरचं त्यांच्या हळदी समारंभाचे फोटोही सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल झाले होते. यावेळी अमृताने पिवळ्या रंगाचा डिझाइनर लेहंगा परिधान केला होता तर तर प्रसादने हिरव्या व मोती कलरचा सदरा, पायजमा परिधान केला होता. अमृताने त्या लेहंग्यावर तिने फुलांनी सजलेले व मोत्यांनी बनलेले दागिने परिधान केले होते. ज्यात तिचा लूक अगदी खुलून दिसत होता.

Tags: amruta deshmukhamruta deshmukh and prasad javadeamruta deshmukh and prasad jawade weddingentertainmentmarathi actormarathi actressprasad jawade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंतचा होणार प्रवेश, तर पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीची वाईल्ड कार्ड एंट्री?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.