शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“…म्हणून मराठी इंडस्ट्री सगळ्यात मागे आहे”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय पाटकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “पण अशोक मामांना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 26, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vijay Patkar On Raj Thackeray Statement

"…म्हणून मराठी इंडस्ट्री सगळ्यात मागे आहे", राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय पाटकर स्पष्टच बोलले, म्हणाले, "पण अशोक मामांना…"

१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकरांना लगावलेले बोल विशेष चर्चेत राहिले. कलाकारांनी एकमेकाला मान न देण्यावरुन त्यांनी चांगलंच खडसावलं. यावेळी बोलताना टोपणनावाचा मुद्दा अधोरेखित करत त्यांनी, “पहिली व शेवटची गोष्ट ती म्हणजे तुम्ही एकमेकांना मान दिला नाहीत, तर लोक तुम्हाला मान का देतील? तुम्ही एकमेकांना लोकांसमोर, अद्या, फद्या, शेळ्या, मेंढ्या, अंड्या अशा काही नावांनी हाका मारता. आज मराठीमध्ये बरेच कलावंत आहेत. पण मराठी चित्रपटांना स्टार नाही.” असं ते म्हणाले होते. यावर बऱ्याच कलाकार मंडळींनी भाष्य करत आपापलं मत मांडलेलं पाहायला मिळालं. (Vijay Patkar On Raj Thackeray Statement)

अशातच बऱ्याच मराठी, हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते विजय पाटकर यांनी नुकतीच इट्स मज्जाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सिनेइंडस्ट्रीबाबत बरंच भाष्य केलं. दरम्यान त्यांनी राज ठाकरे यांच्या वक्त्यव्याला दुजोरा दिलेला पाहायला मिळाला. याबाबत बोलताना विजय पाटकर म्हणाले, “अगदी बरोबर आहे. राज साहेबांचं बोलणं अगदी बरोबर आहे. आपली मराठी इंडस्ट्री सगळ्यात मागे आहे त्याच हे एक कारण आहे. तुम्ही सगळ्यांसमोर पट्या, वाड्या, पटक्या, अंड्या अशी हाक मारता, त्यामुळे तुमचे हे नट लोकांना वाटतंच नाहीत. तुमचे नट मोठे वाटत नाही”.

आणखी वाचा – “कधीच मूल नको आहे असं…”, आई होण्याबद्दल स्पृहा जोशी स्पष्टच बोलली, म्हणाली, “बाळ झाल्यानंतर…”

पुढे ते म्हणाले, “बरोबर आहे. मी तर असं म्हणेन की हा व्यावहारिक नाही तर व्यावसायिक विषय आहे. हे अंड्या वगैरे तुम्ही बोलता पण अभिनय केल्यानंतरही तुम्ही त्यांच्याशी तसेच वागता, त्यांची भंकस करता, त्यामुळे व्यावसायिक बाजू येते तेव्हा तुम्ही मागे पडता. काळ नाटकाच्या शोला तुम्ही भंकस केली, परत तेच सेटवरही असतं. काम करा, कामाकडे फोकस करा कारण निर्मात्याचे पैसे लागलेले असतात. शूटच्या वेळेला केलेली भंकस करण्यात जो वेळ जातो तेव्हा निर्मात्याचे त्यामागे पैसे असतात, वेळ वाढली की त्याचे पैसे वाढतात. दहा, पंधरा मिनिटे भंकस हा वेगळा विषय आहे पण आजकाल तासनतास भंकस केल्या जातात”.

आणखी वाचा – सफाई कर्मचाऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला, “अशी असंख्य माणसं…”

यापुढे ते किस्सा सांगत असंही म्हणाले की, “मी लक्ष्मीकांत बेर्डेला कधीच लक्ष्या हाक मारली नाही, मी त्याला लक्ष्मी हाक मारायचो. सुपरस्टार आहे तो. त्याला भेटायला बाहेर रांग लागलेली असायची. फक्त एक राज साहेब म्हणाले की, अशोक मामांना मामा का हाक मारता. मामा हा आदर आहे. आपण नात्यांमध्ये बोलतोच की ताई, माई, मामा, काका पण ती हाक आदरार्थी असते. सुधीर जोशी वयाने मोठे होते आम्ही त्यांना सुधीर दादा हाक मारायचो, काही काहीजण टकल्या वगैरे काही म्हणायचे. ही बॉम्ब केवळ मराठी सिनेसृष्टीत आहे हिंदीत नाही. साऊथला तर अजिबातच नाही”.

Tags: entertainmentmarathi actorRaj thackeray At Natya Sammelanvijay patkarvijay patkar on raj thackeray statement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
marathi actress prarthana behere give support to bigg boss 17 fame ankita lokhande see the details

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला जिंकण्यासाठी बॉलिवूडसह मराठी कलाकारांचा पाठिंबा, सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.