अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे मराठी अभिनेते व हिंदुत्ववादी कार्यकर्ते शरद पोंक्षे हे स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध मानले जातात. गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या कृत्याचं समर्थन करणं असो किंवा सावरकरांबाबत घेतलेली टोकाची भूमिका असो, पोंक्षे त्यांच्या वक्तव्यांवरून नेहमी चर्चेत असतात. आजवर शरद पोंक्षे यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याशिवाय अनेक मालिका चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांचं स्थान निर्माण केलं. (Sharad Ponkshe Post)
बऱ्याच न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात शरद पोंक्षे कधीच मागे राहिले नाहीत. सध्या सर्व प्रेक्षकांचा कल हा नाटकांकडे अधिक असलेला पाहायला मिळत आहे अशातच विविध अंगी नाटकं रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला व या नाटकामुळे शरद पोंक्षे यांना एक वेगळीच ओळख मिळाली. या नाटकामुळे लोकप्रिय झालेले शरद पोंक्षे कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले प्रेक्षकांनीही या नाटकाला भरभरुन प्रतिसाद दिला. दरम्यान प्रेक्षकांनी दाखवलेल्या प्रेमापोटी या नाटकांने आजवर बरेच प्रयोग केले.
अशातच आता हे नाटक काही काळासाठी बंद होत आहे आहे. शेवटचा प्रयोग असं म्हणत चाहत्यांनी दाखवलेलं प्रेम पाहून भरून पावलेल्या शरद पोंक्षे यांनी केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यांत चाहत्यांनी म्हणजेच नाटकाच्या कलाकार मंडळींनी व बॅकस्टेज कलाकार मंडळींनी दाखवलेलं प्रेम त्यांनी या पोस्टमधून मांडत त्यांचे आभार मानले आहेत.
शरद पोंक्षे यांनी ही पोस्ट शेअर करत, “आज नथुराम गोडसेचा शेवटचा प्रयोग. माझ्या बरोबर काम करणाऱ्या सर्व कलाकार तंत्रज्ञांनी हे पोस्टर बनवून कालीदास मुलूंडच्या गेटवर लावलं. हे त्यांना करावसं वाटलं एवढं प्रेम ते करतात म्हणूनच २५ वर्ष टीम नथुराम टिकली. गुण्यागोविंदाने नांदली. त्या सर्वांचा मी ऋणी आहे. आता आज ४.३० ते ७.३० शेवटच नथुराम रूपात मी बोलेन मग पुर्ण विराम मग नविन नाटक ‘हिमालयाची सावली’ नोव्हे २०२४ मध्ये घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद” असे म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.