मागील वर्षात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती केलेली पाहायला मिळाली. काहींनी घरं घेत तर काहींनी गाडी घेत कलाकारांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केलं. आणि याबाबत त्यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. याचबरोबर काही कलाकारांनी अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात पदार्पण करत त्यांचं काम सुरु केलेलं पाहायला मिळालं. टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुल, सुप्रिया पाठारे या अभिनेत्रींनीं तर अभिनयाबरोबरच हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं. अशातच आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने नवं हॉटेल सुरु केलं आहे. (Shreya Bugde New Hotel)
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत अभिनेत्री श्रेया बुगडे हिने तिच्या नव्या हॉटेलचा शुभारंभ केलेला पाहायला मिळाला. सोशल मीडियावरुन स्टोरी रिपोस्ट करत श्रेयाने याबाबतची माहिती दिली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेल्या श्रेयाने आजवर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आता मात्र अभिनयाबरोबरच श्रेयाने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलेलं पाहायला मिळत आहे.
दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘द बिग फिश अँड कंपनी’ हे नवं रेस्टॉरंट तिने सुरु केलं आहे. या नव्या हॉटेलच्या शुभारंभादिवशी मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी श्रेयाच्या नव्या हॉटेलला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. शिवाय अनेक कलाकार मंडळींनी श्रेयाच्या या नव्या हॉटेलचे व्हिडीओ शेअर करत तिला शुभेच्छा दिलेल्या ही पाहायला मिळाल्या. श्रेयाच्या हॉटेलचा व्हिडीओ समोर आला असून श्रेयाच नवं हॉटेल पाहून साऱ्यांनाच थक्क केलं आहे. खूप सुंदर इंटेरियर असलेलं हे नवं हॉटेल साऱ्यांच्या नजरेत भरलं आहे.
श्रेयाच्या या नव्या हॉटेलला पियुष रानडे व सुरुची अडारकर यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. शिवाय एकत्र फोटो पोस्ट करत त्यांनी स्टोरीसुद्धा पोस्ट केलेली पाहायला मिळाली. याशिवाय अभिनेत्री हर्षदा खानविलकर, संजय मोने, सुकन्या मोने, संजय जाधव, सिद्धार्थ जाधव यांसारख्या अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी श्रेयाला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या नव्या हॉटेलला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. श्रेयाचं हे नवं हॉटेल सीफूड खवय्यांसाठी नक्कीच मेजवानी ठरेल यांत शंकाच नाही.