गोविंदीची भाची आणि टीव्ही अभिनेत्री रागिनी खन्ना बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. अलीकडेच तिची बहिणी आरती सिंगच्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. अभिनेत्री एका लग्न समारंभात सहभागी झाली होती. तिथून तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचवेळी, आता अभिनेत्रीच्या धर्म बदलाबाबत एक आश्चर्यकारक पोस्ट समोर आली आहे. रागिणी खन्ना बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. यामुळेच चाहत्यांना तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनाविषयी कोणतेही अपडेट्स नाहीत. अशातच अभिनेतीच्या धर्मांतराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Govinda niece Ragini Khanna News)
रागिणी खन्नाने नुकतीच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. याबरोबर अभिनेत्रीने सांगितले की तिने हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. यानंतर आज २ मे रोजी रागिणी खन्नाची दुसरी पोस्ट समोर आली. या दुसऱ्या पोस्टमध्ये तिने धर्म बदलल्याबद्दल माफी मागितली होती. आणि यापूर्वीची तिची पोस्टही तिने डिलीट केली.
रागिनी खन्नाच्या नवीन व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर एक प्रसिद्ध हिंदी कथाकार दिसत आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने म्हटले की, तिने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि स्वतःला कट्टर सनातनी हिंदू असल्याचे सांगितले आहे. रागिनी खन्ना हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नमस्कार, मी रागिणी खन्ना. मला माझ्या मागील पोस्टबद्दल माफी मागायची आहे. मी हिंदू धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता पण आता मी माझ्या मूळ जातीवर परत आले आहे आणि कट्टर हिंदू सनातनी बनण्याच्या मार्गावर आहे”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध तमिळ गायिका उमा रामनन यांचे निधन, वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
रागिनी खन्नाच्या अकाऊंटवरील अलीकडच्या घडामोडी पाहता, कदाचित तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, आता सत्य काय आहे हे फक्त रागिणी खन्नाच सांगू शकते. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या असून तिचे अकाउंट हॅक होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.