बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला जिंकण्यासाठी बॉलिवूडसह मराठी कलाकारांचा पाठिंबा, सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2024 | 9:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actress prarthana behere give support to bigg boss 17 fame ankita lokhande see the details

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला जिंकण्यासाठी बॉलिवूडसह मराठी कलाकारांचा पाठिंबा, सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री म्हणाली...

‘बिग बॉस १७’च्या पर्वाचा महाअंतिम सोहळा बघता बघता अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाने प्रेक्षकांचे अगदी भरभरून मनोरंजन केले. यंदाच्या पर्वात भांडणे, मारामारी, रुसवे-फुगवे, आरोप-प्रत्यारोप यांसह सलमान खानचा ओरडा, शिक्षा हे सगळं काही प्रेक्षकांनी बघितलं. ‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व हे मनोरंजन विश्वातील जोड्यांवर आधारित होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७व्या पर्वात अनेक जोडप्यांनी सहभाग घेतला होता. ५त्यामुळे या जोडप्यांमधील रोजच्या भांडणांचादेखील प्रेक्षकांनी अगदी मनमुराद आनंद घेतला. (Prarthana Behere Give Support to Ankita Lokhande)

अशातच ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा उद्यावर आला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी घरातील प्रत्येक स्पर्धकाचा चाहता वा प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळीदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी समर्थन देत आहेत.

अंकिता लोखंडे ही या घरातील मुख्य आकर्षण बनली आहे. घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ही अभिनेत्री विविध कारणांनी चर्चेत आहे. अंकिताची या शोमध्ये येण्याआधीच ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली होती. या मालिकेमुळे तिला अमाप लोकप्रियता मिळाली होती हे तर जगजाहीर आहेच आणि या शोमुळे ती आणखीनच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे अनेक स्तरातून तिला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.

आणखी वाचा – “…म्हणून मराठी इंडस्ट्री सगळ्यात मागे आहे”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय पाटकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “पण अशोक मामांना…”

अशातच मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने अंकिता लोखंडेला तिचा पाठिंबा दर्शवला आहे. प्रार्थनाने तिच्या सोशल मीडियावर अंकितासाठी खास पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला आहे. प्रार्थनाने अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडीओखाली तिला ‘मत द्या’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अंकिताला उद्याच्या महाअंतिम सोहळ्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

आणखी वाचा – नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाला भारावले शरद पोंक्षे, चाहत्यांचं प्रेम पाहता शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाले, “शेवटचा प्रयोग अन्…”

दरम्यान, प्रार्थना व अंकिता या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे अंकिताला ‘बिग बॉस’च्या शोची विजेती करण्यासाठी तिच्या जुन्या मैत्रिणीने पाठिंबा दिला आहे. याआधी अंकिताला रश्मी देसाई, राखी सावंत, कंगना रानौत, सनी लिओनी या बॉलिवूड अभिनेत्रींसह अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे आणि आता प्रार्थना बेहेरे हिनेदेखील अंकिताला पाठिंबा दिला आहे

Tags: ankita lokhandebigg boss 17bigg boss 17 newsbigg boss newsBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsmarathi actressprarthana behereअंकिता लोखंडेप्रार्थना बेहेरेबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्री
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Shreya Bugde New Hotel

श्रेया बुगडेने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, मराठी कलाकारांची जमली गर्दी, भाऊ पियुष रानडेही बायकोसह पोहोचला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.