बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 4, 2025 | 3:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jaya bachchan angry on paparazzi

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्...

बदलत्या काळानुसार कलाक्षेत्रातीलही अनेक गणितंही बदलत गेली. तंत्रज्ञान, काम करण्याची पद्धत, कलाकारांच्या सोयी-सुविधा असे अनेक बदल इंडस्ट्रीमध्ये झाले. अशातच एक नवा प्रकार काही वर्षांपूर्वी रुजला तो म्हणजे पापाराझी फोटोग्राफर्स. सोशल मीडिया आधीच अधिक वेगाने प्रचलित झालं असतं तर पापाराझीने बहुदा आधीच जन्म घेतला असता. असो आता पापाराझींमुळे कलाकारांचे विविध पैलु समोर येतात. त्याहीपेक्षा आपला लाडका कलाकारा कुठे जातो, त्याचे ट्रेंडिंग लूक समोर येतात. चाहत्यांना हे पाहण्यात अधिक रस असतो. मात्र बऱ्याचदा कलाकारांचा खरा चेहरा पापाराझींमुळे समोरही येतो. असंच काहीसं जया बच्चन यांच्याबाबतीत घडताना दिसतं. (Jaya bachchan angry on paparazzi)

फोटोग्राफर्सला पाहिलं की, जया यांना नेमकं काय होतं? असा प्रश्न सातत्याने नेटकऱ्यांच्या मनात डोकावतो. एखादा कार्यक्रम, पुरस्कार सोहळा किंवा रेडकार्पेटवर पापाराझींनी जया यांना घेरलं की, त्यांचा राग अनावर होतो. कित्येकदा तर त्या फोटोग्राफर्सवर ओरडूनच बोलतात. क्वचितच त्यांचा मूड चांगला असेल तर त्या हसताना दिसतात. अशातच आता त्यांचा रुद्र अवतार दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

आणखी वाचा – प्रेमानंद महाराजांच्या आशिर्वादामुळे विराट कोहलीला यश, एका भेटीनंतर गणित बदललं अन्…; सोशल मीडियावर तुफान चर्चा

View this post on Instagram

A post shared by Bollywood Paparazzi (@bollywoodpaparazzii)

रानी मुखर्जी व काजोलचे काका दिग्दर्शक रोनो मुखर्जी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. रोनो यांची प्रार्थना सभा ठेवण्यात आली होती. यावेळी बॉलिवूडमधील अनेक मंडळी उपस्थित होती. दरम्यान जयाही या प्रार्थना सभेला पोहोचल्या. मंगळवारी रोनो यांच्या घरी प्रार्थना सभा ठेवण्यात आली. जया त्यांची लेक श्वेता बच्चनसह रोनो यांच्या घरी गेल्या. प्रार्थना सभेमधून बाहेर येताना त्यांनी पापाराझी छायाचित्रकारांना पाहिलं. त्यांना पाहून जया अचानक भडकल्या आणि ओरडू लागल्या.

आणखी वाचा – “मी आता मरणार असं वाटत होतं आणि…”, इमरान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितलं घटस्फोटाचं सत्य, हालत अशी की…

जया फोटोग्राफर्सना ओरडल्या. म्हणाल्या, “चला तुम्हीही माझ्याबरोबर या. तुम्ही सगळेच बकवास आहात. सगळेच्या सगळे घाणेरडे आहात”. जया यांना चिडलेलं पाहता श्वेताने त्यांना गाडीमध्ये बसवलं. तरीही जया शांत बसल्या नाहीत. त्या गाडीमध्ये बसूनही पुन्हा एकदा फोटोग्राफर्सना ओरडल्या. म्हणाल्या, “या या आता गाडीमध्ये येऊन बसा”. जया यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अशा अभिनेत्रीचं शूट न करण्याचा सल्ला अनेकांनी कमेंट्सच्या माध्यामातून पापाराझींना दिला आहे.

Tags: bollywood newsentertainment newsjaya bachchan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Dipika Kakar Health

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, "आता आयसीयूमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.