बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 4, 2025 | 5:48 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nivedita saraf talk about ashok saraf

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता...”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन...”

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. तो क्षण अशोक मामांसह त्यांची पत्नी निवेदिता सराफ, संपूर्ण कुटुंबिय आणि मराठी इंडस्ट्रीसाठी अभिमानाचा क्षण होता. आयुष्यातील मोठं स्वप्न पूर्ण झालं असल्याच्या भावना यावेळी अशोक यांनी व्यक्त केल्या. कलाक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अशोक यांना त्यांच्या कामाची सुंदर पोचपावती मिळाली. या सोहळ्याला अशोक यांच्यासह निवेदिताही होत्या. त्या परदेशात होत्या. मात्र नवऱ्याचा सन्मान आणि सोनेरी क्षण तिथे उपस्थित राहून त्यांना अनुभवायचं होतं. म्हणूनच त्या लगेचच परदेशातून भारतात निघून आल्या. आता त्यांनी अशोक यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. (Nivedita saraf talk about ashok saraf)

ITSMAJJA शी संवाद साधताना निवेदिता यांनी अशोक यांचं कौतुक केलं. तसेच हा पुरस्कार मिळायला उशीर झाला असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केली. निवेदिता म्हणाल्या, “त्यांना पुरस्कार मिळाला हा क्षण मी अनुभवला नसता तर मी आता ढसाढसा रडत असते. मला काहीच सुचलं नसतं. माझ्या नवऱ्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा आमच्या आयुष्यात सगळ्यात मोठा क्षण होता. मी तिथे असणं कशाहीपेक्षा मोठंच होतं.

आणखी वाचा – Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

“मी तिथे पोहोचू शकले यासाठी मी परमेश्वराचे आभार मानते. २५ किंवा २६ तारखेला पुरस्कार प्रदान करण्यात आला असता तर मी आले नसते. २७ तारखेला सोहळा झाला. धावत पळत मी फ्लाइट बूक करत सोहळ्यासाठी पोहोचले. अशोक नेहमीच दुसऱ्यांनाही बरोबर घेऊन जातात. खूप दिग्गज कलाकार असतात जे दुसऱ्याचा सीन स्वतःवर फिरवून घेतात, दुसऱ्याचे डायलॉग कट करतात, एडिटींगमध्ये ढवळाढवळ करतात. असं आपण खूप बघत आलो आहोत”.

आणखी वाचा – प्रेमानंद महाराजांच्या आशिर्वादामुळे विराट कोहलीला यश, एका भेटीनंतर गणित बदललं अन्…; सोशल मीडियावर तुफान चर्चा

“पण अशोक कधीच असं करत नाही. ते स्वतःबरोबर दुसऱ्यालाही मोठं करतात हे नेहमीच सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. बरोबरच्या कलाकाराला मनमोकळं राहू देतात. दुसऱ्या व्यक्तीचा जर सीन असेल तर तो त्याचाच राहू देतात. पद्मश्री मिळणार हे जेव्हा जाहिर झालं तेव्हा खूप भारी वाटलं. देर आए दुरुस्त आए असं वाटलं. आधीच मिळालया हवं होतं. पण खूप आनंदाची भावना होती”. निवेदिता यांनी अभिमानाने अशोक यांचं कौतुक केलं.

Tags: ashok sarafentertainment newsNivedita  Saraf
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Chahat Khanna Personal life

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, "पैशांसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.