चंदेरी दुनियेमध्ये वावरणाऱ्या मंडळींची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात प्रेक्षकांना अधिक रस असतो. बरीच कलाकार मंडळी आपल्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे भाष्य करतान दिसतात. तर काही सोशल मीडियाद्वारे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांबाबत व्यक्त होताना दिसतात. कलाकार मंडळींचं नातं, अफेअर, लग्न, रिलेशनशिप काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. पण आता एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.
मराठी मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोमध्ये काम करत प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी. मीराने तिच्या अभिनयाच्या जोरावर कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं स्थान बळकट केलं. आता तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मीरा एका व्यक्तीला डेट करत आहे. त्याच व्यक्तीबरोबरचा फोटो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
आणखी वाचा – Video : …अन् रेल्वेस्थानकार डान्स करत राहिल्या ‘बाईपण भारी देवा’मधल्या अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल
मीराने तिच्या बॉयफ्रेंडसह फोटो शेअर केला आहे. तिने बॉयफ्रेंडबरोबर खास फोटोशूट केलं. पण तिचा बॉयफ्रेंड नेमका कोण? हे तिने सांगितलेलं नाही. शिवाय या फोटोंमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा चेहराही तिने लपवला आहे. मीराने शेअर केलेल्या फोटोला तिने एक लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. ती म्हणाली, “Drunk in Love”.
मीराने बॉयफ्रेंड, रिलेशनशिप गोल, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असे विविध हॅशटॅग दिले आहेत. तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. मध्यंतरी मीरा तिच्या कार अपघातामुळे चर्चेत आली होती. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मीराचा कार अपघाता झाला होता. दरम्यान अपघातानंतर तिला मोठा धक्का बसला. पण नवीन कार खरेदी करत ती आता पुन्हा एकदा प्रवास करत आहे.