रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपालीच्या सांगण्यावरुन राजाध्यक्ष कुटुंबियांचा नेत्रा, अद्वैत व इंद्राणीवर हल्ला, लेकींच्या मदतीला धावली देवीआई, आता विरोचक व त्रिनयना देवीचा संहार

Saurabh Moreby Saurabh More
मे 19, 2024 | 12:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Trinayana Devi will come to help Netra and Indrani

रुपालीच्या सांगण्यावरुन राजाध्यक्ष कुटुंबियांचा नेत्रा, अद्वैत व इंद्राणीवर हल्ला, लेकींच्या मदतीला धावली देवीआई, आता विरोचक व त्रिनयना देवीचा संहार

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले.

तसेच रुपालीला अद्दल घडवण्यासाठी नेत्रा व इंद्राणी यांनी तिला पेटीत डांबून ठेवले आहे. रुपाली समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून वश करते. रुपालीच्या या वश करण्याच्या युक्तीबद्दल नेत्रा व इंद्राणी यांना माहिती झाली असून त्यांनी रुपालीच्या डोळ्यांत तिखट मसाला टाकून तिच्या गळ्यात साखळदंड अडकवून तिला एका पेटीत डांबतानाचे पाहायला मिळाले. मात्र विरोचकाने रुपालीची या बंद पेटीतून सुटका केली आहे. अशातच मालिकेचा नुकताच आलेला एक नवीन प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपतानाच सायली-अर्जुन एकमेकांच्या प्रेमात, सायलीने अर्जुनविषयीची प्रेमभावना केली व्यक्त, नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

या नवीन प्रोमोमध्ये रुपालीने वश केलेला राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपालीच्या म्हणण्याप्रमाणेच वागत आहे. त्यामुळे रुपाली केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस यांना नेत्रा व अद्वैतसह इंद्राणीवर हल्ला करायला सांगते आणि रुपालीच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व नेत्रा, अद्वैत व इंद्राणी यांच्यावर हल्लाही करतानाचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. रुपाली “संपवा या तिघांना” असं म्हणताच फाल्गुनी नेत्रा, अद्वैत, इंद्राणी यांच्यावर चाकूने हल्ला करते तर, बाकी सगळेही त्या तिघांचा जीव घेण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जातात.

आणखी वाचा – अधिपती-अक्षरा यांच्या प्रेमाची होते आहे नवीन सुरुवात, पण भुवनेश्वरी आणणार दोघांत अडथळा, दोघांचे प्रेम बहरणार का? नवा ट्विस्ट

अशातच त्या तिघांना वाचवण्यासाठी त्रियनयना देवी नेत्राच्या मदतीला धावून येतानाचे पाहायला मिळत आहे. विरोचकांचा संहार करायला त्रिनयना धावून येणार असल्याचे या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अखेर नेत्राच्या हाकेला देवीआई धावून आली आहे. त्यामुळे आता देवीआई व विरोचकांच्या या संहारात कुणाचा वध होणार? नेत्रा देवीआईच्या साथीने राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या तावडीतून सोडवणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Pankaj Tripathi Mirzapur series third season will come soon on amazon prime video ott see the details

ठरलं तर मग! ‘या’ दिवशी येणार बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापुर’चा तिसरा सीझन, पंकज त्रिपाठींच्या ‘त्या’ पोस्टमुळे उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.