अनेक मराठी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचं काम करत असतात. विविध विषयांवर मालिका निर्मित करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचं काम केलं आहे ते म्हणजे झी मराठी या वाहिनीने. दर्जेदार कलाकार आणि त्यांच्या दर्जेदार अभिनयासह झी मराठी मागील अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. झी मराठी वाहिनी सध्या अनेक नवीन विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येताना दिसत आहे. या नवीन विषयांपैकी दोन बहिणींच्या आयुष्यावर भाष्य करणारी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवीन मालिका २१ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(sara kahi tichyasathi new serial cast)
अभिनेत्री खुशबू तावडे(khushboo tawde), शर्मिष्ठा राऊत, अभिनेते अशोक शिंदे यांसह अनेक कलाकार या मालिकेचा प्रमुख भाग असणार आहेत. मालिका प्रदर्शित होण्यापूर्वीच मालिकेची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. ‘सारं काही तिच्यासाठी’ ही २ सख्ख्या बहिणींची ज्या २० वर्षांपूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे एकमेकींपासून लांब राहत आहेत. एकमेकींपासून लांब राहून देखील दोघींच्या मनात एकमेकांसाठी प्रेम आणि जिव्हाळा कायम आहे. मालिकेच्या प्रमोशन निमित्त घडलेल्या एका प्रकारात पडद्यावरील बहिणींप्रमाणेच खऱ्या आयुष्यतील काही बहिणींची मनं देखील पुन्हा जोडली गेली.
या मालिकेतील उमा आपल्या लांब असलेल्या बहिणीसोबत पत्राद्वारे संपर्क साधते परंतु रघुनाथरावांना दिलेल्या वचनामुळे ते पत्र तिच्या पर्यंत पोहचत नाही. परंतु मालिकेच्या प्रमोशननिमित्त जमलेल्या महिलांना अभिनेत्री खुशबू तावडेने कार्यक्रमात उपस्थित महिलांना त्यांच्या बहिणींना काही कारणांमुळे कधी व्यक्त न केलेल्या भावना पत्राद्वारे मांडण्याचं आवाहन केलं आणिमुंबई, सोलापूर, सांगली, अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात बहिणीच्या आठवणी मनात साठलेल्या तब्बल ४००० महिला पत्राद्वारे व्यक्त झाल्या.(sara kahi tichyasathi zee marathi)
काहींनी तर आम्ही हे कदाचित कधीच बोलू शकलो नसतो पण तुमच्या या मालिकेच्या निमित्ताने मनातल्या गोष्टी पत्राद्वारे सांगता आल्या म्हणून या मालिकेचे आणि झी मराठीचे आभार देखील मानले. ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवीकोरी मालिका २१ ऑगस्ट पासून संध्या. ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.