बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपतानाच सायली-अर्जुन एकमेकांच्या प्रेमात, सायलीने अर्जुनविषयीची प्रेमभावना केली व्यक्त, नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
मे 19, 2024 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla tar mag Marathi serial upadate Sayali expresses her love for Arjun to Kusumtai new promo

कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपतानाच सायली-अर्जुन एकमेकांच्या प्रेमात, सायलीने अर्जुनविषयीची प्रेमभावना केली व्यक्त, नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. मालिकेतील रंजक कथानक, कलाकारांचा सकस अभिनय प्रेक्षकांना या मालिकेकडे आकर्षित करत आहे. मालिकेत सध्या सायली-अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे कथानक सुरू असून हे नाईन कथानक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेत नुकताच सायली-अर्जुन यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय खास सेलिब्रेशन करतानाचे पाहायला मिळाले.

एकीकडे घरातील सगळे सायली-अर्जुन यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत आहेत, तर दुसरीकडे सायली-अर्जुन यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजही संपणार आहे. पण एकीकडे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत असताना दुसरीकडे सायली-अर्जुन त्यांच्या नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण दोघांनाही याबद्दल कल्पना नाही. त्यामुळे ते दोघे एकमेकांपासून वेगळे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र मधुभाऊ सुटेपर्यंत आपला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तसंच राहू देऊयात असं अर्जुन सायलीला म्हणतो. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या नवीन प्रोमोमध्ये सायली कुसुमकडे तिला अर्जुनविषयी वाटत असलेल्या प्रेमाविषयी तिची भावना व्यक्त करते. यावेळी कुसुम सायलीला असं म्हणते की, “सायली मि तुला आधीच सांगितलं होतं की तू या माणसांमध्ये गुतून जाऊ नको. तुझ्या स्वभावामुळे तू अर्जुन व त्यांच्या कुटुंबाच्या माणसांमध्ये गुंतून गेली आहेस.” यावर सायली तिला असं म्हणते की, “मी यांच्यात माझ्या स्वभावामुळे नाही तर अर्जुनच्या स्वभावामुळे अडकली आहे”.

यापुढे ती असं म्हणते की, “कुसुंटाई माझ्यासमोर कुठलीही अडचण आली तरी ते माझ्यामागे ठाम उभे राहतात आणि माझी काळजी घेतात. इतके दिवस आम्ही या खोलीत राहत आहोत पण त्यांनी कधी कुठली मर्यादा ओलांडली नाही. मला अवघडल्यासारखे वाटेल असंही वागले नाही ते कधी.  त्यांनी दूर राहून माझी नेहमीच काळजी घेतली. त्यांनी हे सगळं केलं कारण ते एक माणूस म्हणूण् खूप चांगले आहेत. कुसुमताई मी एकतर्फी प्रेम केलं आहे आणि ते तसंच राहणार आहे.”

दरम्यान, या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय होणार? सायली-अर्जुन एकत्र येणार? की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनुसार दोघे वेगळे होणार? की दोघेही त्यांचे प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करणार? हे पाहण्यासाठी मालिकेचे प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsTharla Tar Mag
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Tula shikvin changlach dhada Marathi serial update new twist of love between Adhipati and Akshara

अधिपती-अक्षरा यांच्या प्रेमाची होते आहे नवीन सुरुवात, पण भुवनेश्वरी आणणार दोघांत अडथळा, दोघांचे प्रेम बहरणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.