सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने फक्त मराठी चित्रपटांच्या स्पर्धेतच नाही तर अगदी बॉलिवूड व हॉलिवूड चित्रपटांच्या स्पर्धेतही बाजी मारली. चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५० दिवस उलटून गेले असले तरीही हा चित्रपट सिनेमागृहात टिकून आहे. या चित्रपटाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असून मराठी सिनेसृष्टीत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. (Actress Shilpa Shared Behind the Scenes)
या चित्रपटाची चर्चा होत असताना अशातच याच्या चित्रिकरणादरम्यानच्या क्षणांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. चित्रपटातील कलाकार मंडळींनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘बाईपण भारी देवा’मध्ये ‘केतकी’ ही भूमिका साकारणाऱ्या शिल्पा नवलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.‘बाईपण भारी देवा’साठी कलाकार मंडळींनी घेतलेली मेहनत रुपेरी पडद्यावर दिसली. इतकंच नव्हे तर चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींनी चित्रीकरणादरम्यान बरीच धमाल-मस्ती केली.
वाचा – कलाकारांनी कशी केली धमाल-मस्ती?(Actress Shilpa Shared Behind the Scenes)
या चित्रपटातील एक सीन रेल्वे स्थानकावर शूट करण्यात आला. त्याचाच एक व्हिडीओ शिल्पा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भारावून गेले आहेत.रेल्वे स्थानकावर गर्दीमध्ये ‘बाईपण भारी देवा’च्या कलाकारांचा नाचतानाची धमाल यात दिसत आहे. चित्रीकरण पूर्ण झालं असलं तरीही नाच पुढे सुरू ठेवण्याचा उत्साह त्यांनी या व्हिडिओतून शेअर केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी म्हटलं, “बाईपण भारी देवा – Behind the scenes…आमची assistant choreographer थांबली आणि फुगड्या सुरू झाल्या. तिथे हा शॉट कट झाला असणं अपेक्षित होतं”.
आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदमांनी केले नातवाचे जल्लोषात स्वागत, फोटो आले समोर
“पण त्यानंतरचा आमचा उत्साह बघा…”. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. चाहत्यांनीदेखील या व्हिडिओवर बरेच कमेंट केले. एका चाहत्याने तर “तुमची सहा जणींची कमाल आणि धमाल एनर्जी सगळंच भारी होतं”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने शुटिंगच्या वेळेबाबत विचारणा केली. “किती वाजता हा सीन शुट केला? कारण मुंबईच्या गर्दीत असं चित्रीकरण करणं म्हणजे खूप अवघड आहे” असं म्हटलं आहे.