‘फुलपाखरू’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. तिने नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मिडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आपले अनेक मनमोहक फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने तिच्या नव्या चित्रपटाचे एक पोस्टर चाहत्यांबरोबर शेअर केले आहे. छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. मालिकेतील इंद्रा-दिपू अर्थात हृता व अभिनेता अजिंक्य राऊत यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. याबद्दल नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. (Hruta Durgule And Ajinkya Raut New Film Poster)
हृताने तिच्या सोशल मीडियाद्वारे तिच्या व अजिंक्यच्या आगामी चित्रपटाची एक झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. हृता-अजिंक्यच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘कन्नी’ असं आहे. ही पोस्ट शेअर करताच हृता-अजिंक्यच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मालिका संपल्यानंतर जवळपास वर्षभराने ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहेत हे पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत.
हृता-अजिंक्य यांची ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका चांगलीच गाजली होती. मालिकेतील इंद्रा-दिपू यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच या मालिकेदरम्यान हृताचा ‘टाईमपास ३’ व अजिंक्यचा ‘टकाटक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे दोघांना या मालिकेसाठी वेळ देता येत नसल्यामुळे ही मालिका बंद करण्यात आली होती. त्यामुळे टीआरपी चांगला असूनही चाहते नाराज झाले होते. पण आता त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खुपच उत्सुक आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss 17 : संपूर्ण सीझनसाठी नील भट्ट नॉमिनेट, मास्टरमाइंड विकी जैनने घेतला बायकोचा बदला
येत्या ०८ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आजच्या काळाच्या मैत्रीची व प्रेमाची ओळख या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटात हृता व अजिंक्य यांच्याबरोबरच शुभंकर तावडे, वल्लरी विराज व ऋषी मनोहर आदी कलाकारांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.