कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय दिवसेंदिवस अधिकच रोमांचक होत चालला आहे. शोमधील सर्वांची लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे व पति विकी जैन. हे दोघे शोमध्ये गेल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. अंकिता-विकी यांच्यात नेहमीच काहीनाकाही कारणांवरुन वाद, भांडण झाल्याचे पहायला मिळाले आहे. तसेच त्यांच्यात अनेकदा प्रेमही पाहायला मिळाले आहे. अंकिता-विकी हे नेहमीच चर्चेत असतात. अशातच एका व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कलर्स वाहिनीवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून याची सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा सुरू आहे. (Vicky Jain’s Mom Got Angry On Ankita Lokhande)
गेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये अंकिता-विकी या दोघांची आई आली होती. यावेळी त्यांना पाहून अंकिता-विकी दोघेही भावुक झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान या भागात आई व सासुला बघून अंकितादेखील खूप भावुक झाली होती. या व्हिडीओत अंकिता “आई तुमची खूप आठवण येत आहे” आणि “तुमच्यावर खूप प्रेम आहे” असं म्हटली होती. तर अंकिताची आई अंकिताला “तु खूप सक्षम आहेस आणि सक्षमपणे खेळूनच या घराच्या बाहेर निघ’ असं म्हटली होती.
अशातच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात विकी आईला पाहून ढसाढसा रडत आहे तर विकीची आई अंकिताला ओरडताना दिसली आहे. या व्हिडीओत अंकिताची आई विकीला “तु जसा आहेस तसा इथे दिसत नाही आहेस” असं म्हणत आहे. तर यापुढे विकीची आई अंकीतावर जोराने ओरडत असे म्हणते की, “तुमच्या दोघांत किती भांडणं होत आहेत. तु अंकिताला अशी सूट दिली आहेस ना…” यावर अंकिता विकीच्या आईला मध्येच थांबवत “सूट दिली म्हणजे मम्मा?” असं बोलते.
आणखी वाचा – Bigg Boss 17 : संपूर्ण सीझनसाठी नील भट्ट नॉमिनेट, मास्टरमाइंड विकी जैनने घेतला बायकोचा बदला
दरम्यान या व्हिडीओखाली “सासू ही सासुच असते, ती कधीच आई बनू शकत नाही, विकी अंकिताला नेहमीच विचित्र वागणूक देतो, अंकिताची सासू ही खरच खतरनाक आहे, अंकितासाठी वाईट वाटत आहे” अशा अनेक कमेंट्स करत विकीच्या आईला ती अंकिताबरोबर वाईट वागत असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अंकिताला पाठिंबा दिला आहे.