सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साखरपुडा झाला, पत्रिकाही छापल्या अन्…; सासरी जाण्यापूर्वी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मोडलं होतं स्वतःचं लग्न, कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 8, 2024 | 7:48 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
actress shilpa shinde broke wedding

साखरपुडा झाला, पत्रिकाही छापल्या अन्...; सासरी जाण्यापूर्वी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मोडलं होतं स्वतःचं लग्न, कारण...

‘भाभीजी घरपर है’ या मालिकेतून अंगुरी भाभी म्हणून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिंदे. मालिकेमधून प्रसिद्ध झाल्यानंतर तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर शिल्पा ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीजनमध्ये दिसून आली होती. यामध्ये तिने विजेतेपदही पटकावले होते. पण असे असतानाही तिचे खासगी आयुष्य मात्र गुंतागुंतीचे असलेले पाहायला मिळाले आहे. एका अभिनेत्याबरोबर तिचे लग्न होता होता राहिले. पण तिचे लग्न का होऊ शकले नाही हे आज आपण जाणून घेऊया.  (actress shilpa shinde broke wedding)

अभिनेता रोमित राजबरोबर २००९ साली शिल्पाचा साखरपुडा झाला होता. त्यांचे लग्नदेखील होणार होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच शिल्पाने साखरपुडा मोडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोमित हा योग्य मुलगा असल्याचे शिल्पाच्या नातेवाइकांनी तिला समजावले होते. मात्र तिने कोणाचेही ऐकून घेतले नाही.  याबद्दल तिने एका माध्यमाबरोबर संवाद साधताना सांगितले की, “रोमित व माझा साखरपुडा झाला तेव्हा माझे वय खूपच कमी होते. त्यावेळी मला लग्न करुन सेटल व्हायचे नव्हते. मला करियर करायचे होते. त्यानंतरच आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला”.

आणखी वाचा – “भुवनेश्वरीकडून हे अपेक्षित नाही”, अधिपतीचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीची धडपड, मालिकेच्या कथेवर प्रेक्षक नाराज, म्हणाले, “इतका आईवडा…”

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shinde (@shilpa_shinde_official)

तसेच त्यांच्या नात्याबद्दल ‘बिग बॉस’मध्ये ही खुलासा करताना सांगितले की, “रोमितवर माझे खूप प्रेम होतं. तसेच मी त्याच्या कुटुंबाचा खूप आदरही करायचे. मी त्यांच्यासाठी खूप करायचे. पण मी जेवढे त्यांच्यासाठी करत होते तेवढे खूप कमी पडत होते. त्य लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. त्यामुळे मी त्यांच्या वागण्याला कंटाळून लग्न मोडले”.

आणखी वाचा – रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांच्यामध्ये वाद? फोटो डिलिट करण्यावरुन रणवीरच्या टीमचे स्पष्टीकरण, म्हणाले, “ते फोटो…”

त्यानंतर २०११ साली ती ‘चिडियाघर’ या मालिकेत दिसून आली. त्यानंतर मालिकाविश्वात तिने आपले अस्तित्त्व निर्माण केले. रोमित बरोबरचे लग्न मोडल्यानंतर ती आता पर्यंत एकटीच आयुष्य जगत आहे. रोमितने टिना कक्करबरोबर लग्न केले. त्याला आता एक मुलगीही आहे. दोघेही आपापल्या आयुष्यात खुश आहेत.

Tags: Hindi serialshilpa shindetelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Next Post
09 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

गजकेसरी योगासह शोभन योगामुळे धनु राशीसह ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार, कुणाला होणार आर्थिक फायदा?, जाणून घ्या... 

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.