Bigg Boss Updtes : ‘बिग बॉस १७’चा प्रवास आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या २८ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी घरातील अंतिम लढतीसाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये आयेशा खान व ईशा मालवीय हे दोन स्पर्धक घरातून बाहेर पडले. अशातच कालच्या भागात विकी जैन हादेखील घरातून बाहेर पडला आहे.
बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात अंकिता लोखंडे व विकी जैन या दोघांची चांगलीच चर्चा झाली होती. शोच्या पहिल्या दिवसापासून या दोघांमढेल वाद, भांडणे, मारामारी आदी कारणांमुळे हे दोघे बरेच चर्चेत राहीले. अशातच आता विकी जैनचा या घरीतील प्रवास संपल्यामुळे साहजिकच अंकिताला अश्रु अनावर झाले आहेत. विकीच्या जाण्याने अंकिता कोलमडून गेल्याचे पाहायला मिळाले. विकीच्या जाण्याने अंकिताला खूपच दु:ख झाले. त्यामुळे विकीला निरप देताना अंकिता ढसाढसा रडली.

यादरम्यान, अंकिताला सर्व स्तरातून ती खंबीरपणे लढावी यासाठी पाठिंबा मिळत आहे. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील सोशल मीडियावर खास पोस्ट करत अंकिताला पाठिंबा दिला आहे. अमुताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “प्रिय अंकू (अंकिता लोखंडे) मला माहित आहे की, तू सर्वात खंबीर स्त्रियांपैकी एक आहेस. त्यामुळे तुला असे पाहणे ही खूपच दु:खदायक आहे. पण ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी जसा राखेतून जन्म घेतो, तशीच तूही आहेस आणि तूही पुन्हा नव्याने सुरुवात करशील असा मला विश्वासदेखील आहे.”
आणखी वाचा – यंदाच्या ‘ऑस्कर २०२४’चे नामांकन जाहीर, यादीत भारतीय चित्रपटाला स्थान नाही, वाचा संपूर्ण list
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी आता अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा व अरुण महाशेट्टी हे ४ स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे या स्पर्धकांपैकी ‘बिग बॉस’च्या विजेतेपदाचा मान कोण पटकावणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.