Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फिनाले जवळ आला असून या शोने आठवड्याच्या मध्येच घेतलेल्या एलिमिनेशन टास्कने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण ‘बिग बॉस’च्या घरातील एका स्पर्धकांचा प्रवास संपला आहे. अंकिता लोखंडेचा पती विकी जैन ‘बिग बॉस’च्या घरातून बेदखल झाला आहे. विकी जैन या शोमधून बाहेर पडला असल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा उमटलेला सूर पाहायला मिळत आहे. चाहत्यांपैकी बहुतेकांचा असा विश्वास होता की विकी टॉप ५ मध्ये येण्यास पात्र होता.
विकी शोमधून बाहेर आला आहे, पण तो बाहेर येताच त्याने अद्याप एकही मुलाखत दिलेली नाही. पण त्याचे काही फोटो समोर आले आहेत जे शोच्या बाहेरचे आहेत आणि ज्यामध्ये तो मित्र-मंडळी व कुटुंबियांसह सेलिब्रेशन करताना दिसत आहे. असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, ज्याची अंकिता लोखंडेला भीती होती तिचं गोष्ट घराबाहेर घडताना दिसत आहे.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर जाताना अंकिताने विकीला पार्टी करु नकोस असे वारंवार बजावून सांगितलं होतं. मात्र आता समोर आलेल्या फोटोंवरुन तो पार्टी करत असल्याचे दिसत आहे. जेव्हा अंकिताला ही गोष्ट कळेल तेव्हा या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण होणार हे नक्की. विकीचे फोटो त्याची बहीण खुशी जैन हिने शेअर केले आहेत. खुशीने याआधी विकीबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, “भाऊ परत आला आहे, हाच खरा विजेता आहे”.
खुशीने पुन्हा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये विकी, टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी व ईशा मालवीय दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून परतताच विकीचा प्रवास साजरा केला जात असल्याचे चित्र या फोटोंमध्ये दिसत आहे. विकीच्या जाण्यानंतर, शोमध्ये आता अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा व अरुण माशेट्टी हे स्पर्धक आहेत. आता या ५ स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक या सीझनची ट्रॉफी घरी घेऊन जाईल हे पाहणं रंजक ठरणार आहे.