Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ चा फिनाले अवघ्या चार दिवसांवर आला आहे. या कार्यक्रमाने विजेतेपदाची उत्सुकता अधिक वाढविली असल्याचं समोर आलं आहे. अशातच आठवड्याच्या मध्येच ‘बिग बॉस’ने नॉमिनेशन प्रक्रिया केली. यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातून एका स्पर्धकाचा प्रवास संपला असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात १०० दिवस घालवल्यानंतर विकी जैन या शोमधून बाहेर पडला आहे. विकी बाहेर पडताच अंकिता शोमध्ये रडताना दिसली.
‘बिग बॉस’ने अंकिता लोखंडे, विकी व अरुण माशेट्टी यांना त्यांच्या चिठ्ठया उघडण्यास सांगितल्या. आणि त्यांच्यापैकी कोण फिनालेमध्ये गेले आहे हे वाचून सांगण्यास सांगितले. सर्वांनी आपापली चिट्ठी उघडायला सुरुवात केली तेव्हा विकीने आपला पेपर मोठ्याने वाचला, ज्यावर लिहिले होते, ‘एव्हिक्टेड’ असं लिहिण्यात आलं होतं. तर अंकिता व अरुण अंतिम फेरीत सहभागी झाले.
त्यावेळी बिग बॉस विकी-अंकिताला एक प्रश्न विचारतात की, “एक जोडपं म्हणून या शोमध्ये येण्याचा अनुभव कसा होता?”, यावर अंकिताने असं उत्तर दिलं की, “तुम्ही इतरांशी भांडू शकता, पण तुमच्या स्वत:च्या लोकांशी नाही”. विकी म्हणाला की, “त्यांना आता त्यांचे नाते अधिक चांगले समजले आहे आणि बिग बॉसमुळे लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षातच त्यांना चुका सुधारण्याची संधी मिळाली याविषयी ते आनंदी आहेत”.
एव्हिक्टेड झाल्याचं कळल्यानंतर विकीने अंकिताच्या कपाळावर चुंबन घेतले आणि मन्नारा चोप्रा, मुन्नवर फारुकी व अभिषेक यांना मिठी मारली. त्याने अंकिताबरोबर काही वेळ घालवला तेव्हा अंकिताला अश्रू असह्य झालेले पाहायला मिळाले. विकीने इतर सदस्यांना त्याच्या अनुपस्थितीत अंकिताची काळजी घेण्याचे आवाहन केले. अंकिता विकीला म्हणाली, “तू माझ्यासाठी विजेता आहेस कारण तू खूप चांगला खेळलास. कोणत्याही व्यासपीठाशिवाय तू इथे आपली छाप पाडलीस. मला तुझी पत्नी असल्याचा अभिमान आहे. मी विकी जैनची बायको आहे. कृपया नको जाऊस, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत”.