बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तुला असं पाहण्याचे दु:ख…”, अंकिता लोखंडेला ढसाढसा रडताना पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भावुक, म्हणाली, “मला विश्वास आहे की…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 24, 2024 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress amruta khanvilkar support Ankita lokhande with shared post see the details

Bigg Boss 17 : "तुला असं पाहण्याचे दु:ख...", अंकिता लोखंडेला ढसाढसा रडताना पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भावुक, म्हणाली, "मला विश्वास आहे की..."

Bigg Boss Updtes : ‘बिग बॉस १७’चा प्रवास आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या २८ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी घरातील अंतिम लढतीसाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये आयेशा खान व ईशा मालवीय हे दोन स्पर्धक घरातून बाहेर पडले. अशातच कालच्या भागात विकी जैन हादेखील घरातून बाहेर पडला आहे.

बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात अंकिता लोखंडे व विकी जैन या दोघांची चांगलीच चर्चा झाली होती. शोच्या पहिल्या दिवसापासून या दोघांमढेल वाद, भांडणे, मारामारी आदी कारणांमुळे हे दोघे बरेच चर्चेत राहीले. अशातच आता विकी जैनचा या घरीतील प्रवास संपल्यामुळे साहजिकच अंकिताला अश्रु अनावर झाले आहेत. विकीच्या जाण्याने अंकिता कोलमडून गेल्याचे पाहायला मिळाले. विकीच्या जाण्याने अंकिताला खूपच दु:ख झाले. त्यामुळे विकीला निरप देताना अंकिता ढसाढसा रडली.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरातील विकी जैनचा प्रवास संपला, ढसाढसा रडली अंकिता लोखंडे, घट्ट मिठी मारत म्हणाली, “तुझी पत्नी…”

यादरम्यान, अंकिताला सर्व स्तरातून ती खंबीरपणे लढावी यासाठी पाठिंबा मिळत आहे. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील सोशल मीडियावर खास पोस्ट करत अंकिताला पाठिंबा दिला आहे. अमुताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “प्रिय अंकू (अंकिता लोखंडे) मला माहित आहे की, तू सर्वात खंबीर स्त्रियांपैकी एक आहेस. त्यामुळे तुला असे पाहणे ही खूपच दु:खदायक आहे. पण ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी जसा राखेतून जन्म घेतो, तशीच तूही आहेस आणि तूही पुन्हा नव्याने सुरुवात करशील असा मला विश्वासदेखील आहे.”

आणखी वाचा – यंदाच्या ‘ऑस्कर २०२४’चे नामांकन जाहीर, यादीत भारतीय चित्रपटाला स्थान नाही, वाचा संपूर्ण list

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी आता अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा व अरुण महाशेट्टी हे ४ स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे या स्पर्धकांपैकी ‘बिग बॉस’च्या विजेतेपदाचा मान कोण पटकावणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Tags: Amrita Khanwilkarankita lokhandebigg boss 17 newsbigg boss newsBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsmarathi actressअंकिता लोखंडेअमृता खानविलकरबिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्री
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला ज्याची भीती होती तेच घडलं, 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच अभिनेत्रीच्या नवऱ्याने काय केलं पाहा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.