शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आजी सोनियाचा दिनु’ संदीप पाठक आजीला भेटायला पोहोचला उद्गीरमध्ये, सोशल मीडियावर भेटीचा खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 18, 2024 | 2:49 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actor Sandeep Pathak reached Udgir to meet his grandmother and video shared on social media

‘आजी सोनियाचा दिनु’ संदीप पाठक आजीला भेटायला पोहोचला उद्गीरमध्ये, सोशल मीडियावर भेटीचा खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

‘आ’ म्हणजे आत्मीयता आणि ‘जी’ म्हणजे जीवन. आत्मीयतेने जगायला शिकवणारी समृद्धीचे जीवन म्हणजे आजी. आजी आणि नातवाचं नातं कायमच खास असतं. आजीपण हे लांबविलेले आईपण असते. आजी आपल्या नातवंडाबरोबर प्रत्येक दिवस “अजि सोनियाचा दिनु” म्हणून घालवू पाहात असते. आजीच्या प्रेमाला दुधाच्या सायीची उपमा दिली जाते हे खरे, पण आजी फक्त साय जपणे हेच काम करत असते. त्यामुळे प्रत्येक नातवाच्या आयुष्यात आजी ही खास असते.

अशीच आजीची एक खास आठवण अभिनेता संदीप पाठकने शेअर केली आहे.  प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सर्वांचा लाडका अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. संदीप सोशल मीडियावरील अनेक ट्रेंड फॉलो करत असतो.  रिल्स व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच त्याच्या आजीचा एक व्हिडीओ शेयर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Shyamrao Pathak (@mesandeeppathak)

संदीप काही कामानिमित्त उदगीरला गेला असताना त्याने आजीची म्हणजेच आईच्या आईची भेट घेतली. यावेळी त्याने आपल्या आजीबरोबर मनमुराद संवाद साधला. या व्हिडीओमध्ये संदीपची आजी त्याला इथे कसा आला म्हणून विचारते, तेव्हा संदीप मी तुला खास भेटायला आलो” असल्याचे म्हणतो.

आणखी वाचा – येत्या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, अ‍ॅक्शन, थरार अन् सस्पेन्सवर आधारित सीरिज व चित्रपट होणार प्रदर्शित, पाहा संपूर्ण यादी

तसेच या व्हिडीओमध्ये तो माझ्या आजीचे वय आता १०१ असल्याचेदेखील सांगतो. हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने असा म्हटलं आहे की, “आमची माई (आईची आई) वय वर्षे १०१. उदगीरला माईला भेटायला गेलो. मी आलो हे बघून तिला खुप आनंद झाला. अजूनही माझ्या आजीचा आवाज खणखणीत, दात शाबूत, स्मरणशक्तीही तशी आहे. जुनं ते सोनं.”

आणखी वाचा – Video : ‘तेरी मेरी यारियां!’ पूजा सावंतच्या साखरपुड्यात मित्र-मैत्रिणींची मज्जा-मस्ती, प्रार्थना बेहेरेने शेअर केले खास क्षण

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने “नशीबवान आहेस तू” असं म्हणत कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनी “खूप गोड, खूप छान, आजीला आणखी दीर्घायुष्य लाभो” अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssandeep pathakमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजनसंदीप पाठक
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Actor Riteish deshmukh got emotional while speaking on father vilasrao deshmukh

“विलासरावांना जाऊन...”, स्टेजवर वडिलांबाबत बोलताना ढसाढसा रडू लागला रितेश देशमुख, आईलाही अश्रु अनावर अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.